Soybean Harvesting Agrowon
ॲग्रो गाईड

Soybean Harvesting : सोयाबीन ची काढणी करताना या गोष्टी लक्षात घ्या

सध्या सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आहे. बऱ्याच ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सोयाबीन काढणीला वेग येणार आहे.

Team Agrowon

सध्या सोयाबीन पीक (Soybean Crop) काढणीच्या (Soybean Harvesting) अवस्थेत आहे.  बऱ्याच ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सोयाबीन काढणीला वेग येणार आहे. सोयाबीन क्षेत्र (Soybean Area) आणि उत्पादन वाढत असले तरी उत्पादकता (Prductivity) मात्र कमी होत चालली आहे. सोयाबीन उत्पादकता कमी होण्यामागे काढणी आणि काढणीपश्‍चात अयोग्य पद्धतीने हाताळणी देखील कारणीभूत आहे. त्यामुळे सोयाबीनची वेळेवर काढणी, योग्य माध्यमावर मळणी करून योग्य पद्धतीने साठवण करणे आवश्‍यक आहे. बियाण्याची उगवणशक्ती आणि प्रत चांगली राहण्यासाठी सोयाबीनची काढणी करताना काय काळजी घ्यावी या विषय़ी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.   

सोयाबीन पीक पेरणीनंतर साधारणतः ९५ ते १०५ दिवसांत काढणीसाठी तयार होते. पीक परिपक्व झाल्यानंतर पिकाची काढणी लवकर करणे फार महत्त्वाचे आहे. योग्य वेळी काढणी न केल्यास शेंगा तडकून उत्पादनात १५ ते २० टक्के घट येते.

बियाण्यातील ओलावा १४ ते १५ टक्के असताना कापणीला सुरवात करावी. वेळेवर कापणी केल्यास मळणीमध्ये बियांचे नुकसान होत नाही.

पिकाची काढणी धारदार कोयत्याने जमिनीलगत कापून करावी. झाडे उपटून येणार नाहीत याची काळजी घ्यावी. काढणीनंतर सोयाबीनचे एकत्र ढीग किंवा गंजी करून ठेवू नये. यामुळे त्यास बुरशी लागून धान्याची प्रत खालावते.

काढणी केलेले पीक उन्हामध्ये चांगले वाळवावे. मळणीसाठी उशीर होणार असेल तरच वाळलेल्या सोयाबीनची गंजी करून ठेवता येईल.

पेरलेल्या सोयाबीनच्या लवकर पक्क होणाऱ्या जाती जसे की जे एस ९५-६०, जे एस २० ३४, जे एस ९३ ०५, एन आर सी १३० परीपक्वतेच्या अवस्थेत असल्याने स्वच्छ हवामान पाहता ९० % शेंगा वाळल्यानंतर पिकाची वेळेवर कापणी करावी. शेंगा पिवळ्या असताना कापणी केलेले उत्पादन ताबडतोब उन्हात वाळवावे व त्याची मांळणी करावी. पेरणी केलेल्या आणि उशिरा पक्व होणाऱ्या वाणांसाठी देखील शेंगांचा रंगात बदलानुसार पिकाची कापणी करावी. 

परिपक्वतेच्या वेळी पावसामुळे शेंगा दाणे फुटल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि दर्जेदार मळणीसाठी कापणी केलेले पीक योग्य प्रकारे वाळवावे. 

पुढील हंगामात सोयाबीन बियाणे म्हणून वापरायचे असेल तर बियाणे उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळण्यासाठी १३ ते १५ टक्के बियाणे आर्द्रता आणि ३५० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर सोयाबीनची मळणी करावी. 

साठवणुकीसाठी सोयाबीन बियाण्यातील आर्द्रता १२ टक्के पेक्षा जास्त नसावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT