Mosambi  Agrowon
ॲग्रो गाईड

Mosambi Management : मोसंबी झाडांची रोगप्रतिकारकता वाढवा

मराठवाड्यातील मोसंबी बागांना मंद ऱ्हास या जीवणूजन्य रोगापासून वाचविण्यासाठी झाडांची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याची गरज, असल्याचे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

Team Agrowon

गेवराई, जि. बीड: मराठवाड्यातील मोसंबी (Mosambi Orchard) बागांना मंद ऱ्हास या जीवणूजन्य रोगापासून वाचविण्यासाठी झाडांची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याची गरज, असल्याचे प्रतिपादन मोसंबी संशोधन केंद्राचे (Citrus Crop Research Center) प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले.

ताकडगाव (ता. गेवराई) येथे मोसंबी संशोधन केंद्रातर्फे शनिवारी (ता. १२) आयोजित प्रक्षेत्र भेटीदरम्यान ते बोलत होते. या वेळी मोसंबी बागायतदार कृष्णा पुंड, दिनकर पुंड, सुभाष सुतार, तहसीलदार रामराव ठोंबरे, चंद्रकांत राठोड (उमापुर) वस्तु व सेवा कर अधिकारी राजेंद्र राठोड, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. दीपक कचवे आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ. पाटील म्हणाले, की मोसंबी बागांचे आरोग्य वाढीसाठी रासायनिक, जैविक अन सेंद्रिय खतासोबतच सूक्ष्म मूलद्रव्याची मात्रा वेळोवेळी झाडांच्या वयानुरूप देणे फायदेशीर ठरते. बहराचे नियोजन करताना जमिनीच्या अन पाण्याच्या उपलब्धतेनुसार एकाच बहराचे नियोजन केल्यास झाडे रोग अन किडींना सक्षमपणे तोंड देऊ शकतात. नवीन लागवड करताना आपल्याच बागेतील उत्कृष्ट झाड निवडून त्याची कलमे करणे मंद ऱ्हास रोगास नियंत्रित ठेवणेसाठी फायदेशीर ठरू शकते. या वेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकांची सोडवणूक करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तुरीचा भाव हमीभावापेक्षा कमीच; सोयाबीनमध्ये काहीसे चढ उतार, कापूस काहीसा नरमला, टोमॅटो भावात सुधारणा तर शेवगा स्थिरावला

Monsoon 2026: मॉन्सून केरळच्या उंबरठ्यावर; विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा

Soil Types: जमिनीच्या प्रकारानुसार पिकाची निवड का महत्त्वाची? जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची शिफारस

Panchganga River Pollution: प्रदूषण करणाऱ्या प्रोसेस उद्योगांवर कायमस्वरूपी कारवाईची मागणी : धनाजी चुडमुंगे

Sugar Industry: साखर उद्योगात सुधारणांची गरज : अमोल पाटील

SCROLL FOR NEXT