Mosambi : आधी गुंडीगळ, आता फळगळ

मोसंबी फळपिकावर संकटांची मालिका कायम
Mosambi : आधी गुंडीगळ, आता फळगळ

औरंगाबाद : मराठवाड्याची ओळख बनलेल्या मोसंबी फळ (Mosambi Crop) पिकावर संकटांची मालिका कायम आहे. आधी सेटिंगमध्ये संकट, नंतर मोठ्या प्रमाणात झालेली गुंडीगळ अन् आता सुरू असलेली फळगळ (Mosmbi Fruit Fall ) मोसंबी उत्पादकांचे (Mosmbi Farmer) अपेक्षित अर्थकारण बिघडविते आहे.

Mosambi : आधी गुंडीगळ, आता फळगळ
Mosambi : कृषिकन्यांकडून मोसंबी बाग आराखड्याचे प्रात्यक्षिक

मराठवाड्यात मोसंबीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. अलीकडे काही वर्षांत झालेली लागवड मोठ्या प्रमाणात असली, तरी २५ ते ३० हजार हेक्टर क्षेत्र किमान उत्पादनक्षम असण्याचा अंदाज आहे. या उत्पादनक्षम क्षेत्राला यंदाच्या आंबिया बहरात सुरुवातीला प्रतिकूल वातावरणामुळे सेटिंगसाठी झगडावे लागले. सेटिंग झाल्यानंतर गुंडी अवस्थेत सातत्याने होत असलेली गळ यंदा ६० ते ७० टक्क्यांपर्यंत झाली. त्यामुळे गुंडीचे फळात रूपांतर झालेल्या तीस ते चाळीस टक्के फळांमध्ये आता पुन्हा एकदा गळीचे संकट उभे ठाकले आहे. काही भागांत पाच टक्क्यांपर्यंत असलेली ही फळगळ काही भागात १५ ते २० टक्क्यांपर्यंत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मागील आठवडाभर पडत असलेला सततचा रिमझिम पाऊस अन् सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे आंबिया बहराच्या मोसंबी फळांची गळ होत असल्याचे मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Mosambi : आधी गुंडीगळ, आता फळगळ
जालना जिल्ह्यात डाळिंब, मोसंबी, लिंबूच्या विमा परताव्यात तफावत

डॉ. पाटील म्हणाले, की सतत पडलेल्या पावसामुळे मुळांच्या परिसरात ओलावा जास्त झाला, मुळांची दमकोंडी झाल्याने मुळांच्या जवळ प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन त्यांची कार्यक्षमता कमी झाली. त्यामुळे अन्नद्रव्याच्या वहनात अडथळा निर्माण झाला. तसेच सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे प्रकाशसंश्‍लेषण क्रियेत अडथळा निर्माण होणेही फळगळीला कारणीभूत ठरले आहे. अतिपाऊस झालेल्या ठिकाणी बुरशीचा प्रकोप झाल्याने गळ दिसून आली. याच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशकाची आळवणी केल्यास गळ थांबण्यास मदत मिळेल. वानस्पतिशास्त्रीय फळगळ, बुरशीमुळे होणारी फळगळ, किडीमुळे फळगळ, अति किंवा कमी पाण्यामुळे फळगळ, कर्ब - नत्र असंतुलन, सूक्ष्म मूलद्रव्य कमतरतेमुळे फळगळ, संजीवकांच्या असंतुलनामुळे फळगळ आदी फळगळीची कारणे असल्याचे डॉ. पाटील म्हणाले. मोसंबी संशोधन केंद्र, कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही ठिकाणी याविषयी मार्गदर्शन केले जाते आहे.

जवळपास १७ ते १८ वर्षांच्या १००० झाडांच्या बागेत फळगळ होती आहे. प्रमाण पाच ते दहा टक्क्यांपर्यंत असले, तरी हवामान प्रतिकूल राहिल्यास पुढे काय होईल हा प्रश्‍न असून, काजळीही आहे. फळ जवळपास दीडशे ग्राम असलेल्या बागेत बुरशीनाशकाची फवारणी घेतो आहे.
मंगेश पाटील, मोसंबी उत्पादक, पिंप्रीराजा, ता. पैठण, जि. औरंगाबाद
एकूण मोसंबी बागेपैकी ६०० झाड उत्पादनक्षम आहेत. सुरुवातीला आंबिया बहार सेटिंग होण्याला प्रॉब्लेम आला. त्यानंतर गुंडीगळ जवळपास ६० ते ७० टक्क्यांपर्यंत झाली. आता फळ जवळपास दीडशे ग्रामपर्यंत झाली असताना फळगळ होती आहे. शिवाय अचानक झाड जाण्याचे प्रमाणही शिवारात वाढले आहे.
नंदकिशोर तळेकर मोसंबी उत्पादक, शहापूर, ता. अंबड, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com