Sweet Orange : मराठवाड्यातील मोसंबीवर ‘मंद ऱ्हास’चे संकट ः डॉ. पाटील

मराठवाड्यातील मोसंबी बागांवर ‘मंद ऱ्हास’ या जीवणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच योग्य खबरदारी घ्यावी,’’ असे आवाहन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले आहे.
Sweet Orange
Sweet OrangeAgrowon
Published on
Updated on

बदनापूर, जि. जालना : ‘‘मराठवाड्यातील मोसंबी बागांवर (Sweet Orange Orchard) ‘मंद ऱ्हास’ या जीवणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव (bacterial disease on Sweet Orange orchards) वाढीस लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच योग्य खबरदारी घ्यावी,’’ असे आवाहन मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले आहे.

Sweet Orange
Sweet Orange Insurance : मोसंबीसाठी विमा योजना

मराठवाड्यात अलीकडच्या दोन वर्षांत मोसंबीच्या लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नव्या-जुन्या लागवड झालेल्या बागांपैकी किमान ४० हजार हेक्टर मोसंबी बागा उत्पादनक्षम असतील, असा अंदाज आहे. मोसंबी संशोधन केंद्रातर्फे घेतल्या गेलेल्या निरीक्षणात जालना जिल्ह्यातील बदनापूर, मंठा, घनसावंगी, भोकरदन, अंबड आदी तालुक्यांत मंद ऱ्हासा रोगाचा प्रादुर्भाव विशेषत्वाने आढळून आला आहे. मराठवाड्यात २० ते २३ टक्क्यांपर्यंत या प्रादुर्भावाचे प्रमाण असल्याची शक्यता आहे.

Sweet Orange
Sweet Orange : मोसंबी बागा कीड आणि रोगमुक्त ठेवा

बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथे आयोजित प्रक्षेत्र भेटीदरम्यान डॉ. पाटील यांनी मोसंबी बागायतदारांना या धोक्याविषयी अवगत केले आहे. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य भानुदासराव घुगे, सरपंच भगवान बारगजे, मोसंबी उत्पादक बाबासाहेब दराडे, मधुकर वाघ, प्रकाश शिंदे, संजय देशमुख, तेजराव शिंदे, बालाजी शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘या रोगाचा प्रादुर्भाव भारतात १९७० मध्ये नोंदविण्यात आला. या जीवणूजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोसंबी पिकाचे उत्पादन कमी होऊन फळांची गुणवत्ता खालावते. ‘सिट्रस सायला’ ही रोगाची वाहक कीड असल्याने तिचे नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे. नवीन लागवडीसाठी रोगमुक्त कलमांची निवड केल्यास ‘मंद ऱ्हास’ या रोगास अटकाव केला जाऊ शकतो.’’

फळगळीचा प्रश्न मोसंबी उत्पादकांना चांगलाच भेडसावत आहे. आता ‘मंद ऱ्हास’चे संकट बागांवर कोणते व किती परिणाम घेऊन येते, ही मोसंबी उत्पादकांसाठी चिंतेची बाब ठरेल.

रोगाच्या प्रादुर्भावाची कारणे...

- निरोगी रोपांचा अभाव

- बाहेरील प्रदेशातून रोपे आणणे

- सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अभाव वा कमतरता.

- झाडाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे.

- लागवडीचे अंतर कमी

- ‘सिट्रस सायला’ किडीचा प्रादुर्भाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com