PDKV Solar Light Insect Trap Agrowon
ॲग्रो गाईड

Trap Use : सेंद्रिय पीक पद्धतीत सापळ्याचा वापर कसा करावा?

Pheromone Trap : सेंद्रिय शेतीत सापळ्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सापळे कमी खर्चिक असून, किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक ठरतात.

Team Agrowon

Organic Farming : सेंद्रिय शेतीत सापळ्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सापळे कमी खर्चिक असून, किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक ठरतात. प्राणी वर्गातील कीटक हा सर्वात मोठा वर्ग आहे. कीटक स्वकीयांशी सुसंवाद किंवा संबंध साधण्यासाठी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडतात. तो गंध स्वकीयांमध्ये विशिष्ट प्रकारच्या संदेशवहनाचे कार्य करतो.

या वासामुळे नर/मादीमध्ये चेतना निर्माण होऊन नर-मादी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि समागमासाठी योग्य जोडीदार मिळवू शकतात, त्यामुळे या गंधाला कामगंध (फेरोमोन) असे म्हटले जाते. वेगवेगळ्या पिकांमध्ये उदा. कपाशी, सोयाबीन, मका, तूर, वांगी, भेंडी येणाऱ्या विविध पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या ल्युअर वापराव्या लागतात.

विविध किडीसाठी कोणते ल्युअर वापरावेत?

१) हेलील्युअर, हेक्झाल्युअर --- हिरवी बोंड अळी व्यवस्थापनासाठी.

२) गॉसील्युअर, पेक्टीनोल्युअर --- गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी.

३) व्हीटाल्युअर --- ठिपक्यांची बोंड अळी व्यवस्थापनासाठी.

४) ल्युसील्युअर --- शेंडा पोखरणारी, फळ पोखरणारी अळी व्यवस्थापनासाठी.

५) बॉम्बॅकोल्युअर --- रेशीम शेतीमधील उपद्रवी अळीच्या व्यवस्थापनासाठी.

६) बोडोल्युअर, बाक्युल्युअर --- फळमाशी व्यवस्थापनासाठी.

७) स्पोडोल्युअर --- तंबाखूची पाने खाणारी अळी व्यवस्थापनासाठी.

किडीनूसार सापळ्याचा वापर कसा करावा?

१) फनेल ट्रॅप --- सर्व प्रकारची किडीची फुलपाखरे

२) डेल्टा स्टिकी ट्रॅप --- सर्व प्रकारची किडींची फुलपाखरे

३) वॉटर ट्रॅप --- सर्व प्रकारची पंख वर्गीय कीड

४) फ्लाय ट्रॅप --- सर्व प्रकारच्या माशी वर्गीय किडी

५) लाइट ट्रॅप --- सर्व प्रकारच्या किडींचा फुलपाखरे, माशी वर्गीय किडी व भुंगेरे (बीटल्स)

--------------

माहिती आणि संशोधन - जितेंद्र दुर्गे, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zilla Parishad Elections: पुणे जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

Ajit Pawar Funeral: शोकाकुल वातावरणात दादांना अखेरचा निरोप

Economic Survey: शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मर्यादा

Weather Update: किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Economic Survey 2026: युरियाचा दर वाढवा, थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे, आर्थिक सर्वेक्षण अहवालातून शिफारस

SCROLL FOR NEXT