Salam Kisan Agrowon
ॲग्रो गाईड

Sugarcane Fertilizer Management : ऊस पिकात गंधकयुक्त खतांचा वापर कसा करावा?

Fertilizer Management : जमिनीची व पिकाची अन्नद्रव्याची गरज रासायनिक, सेंद्रिय अथवा जिवाणूजन्य खते यांच्या एकत्रित वापरातूनच पूर्ण होऊ शकते. त्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक आहे. यामध्ये गंधकयुक्त खताचा वापर महत्वाचा ठरतो.

Team Agrowon

Use of Sulphur Fertilizers : पीक फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय खतांची कमतरता, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, अवर्षण परिस्थिती किंवा पाण्याचा जास्त वापर आणि निचऱ्याचा अभाव यामुळे क्षारयुक्त चोपण जमिनीची वाढती समस्या या बाबींमुळे राज्यात ऊस उत्पादकता घटलेली दिसून येते.

जमिनीची व पिकाची अन्नद्रव्याची गरज रासायनिक, सेंद्रिय अथवा जिवाणूजन्य खते यांच्या एकत्रित वापरातूनच पूर्ण होऊ शकते. त्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा अवलंब करणे आवश्यक आहे. यामध्ये गंधकयुक्त खताचा वापर महत्वाचा ठरतो.

१) राज्यातील जमिनीत गंधकाची कमतरता लक्षात घेता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने शाश्वत उत्पादकतेसाठी गंधकयुक्त खतांचा वापर करण्याची शिफारस केली आहे. ऊस लागवडीच्या वेळी ६० किलो मूलद्रवी गंधक प्रतिहेक्‍टरी द्यावे. त्यामुळे ऊस उत्पादनात १० ते २४ आणि १५ ते ३० टक्के साखर उत्पादनात वाढ झाली आहे.

२) ऊस पिकासाठी जेवढी मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांची आवश्‍यकता आहे तेवढीच सुक्ष्मअन्नद्रव्यांची सुद्धा आवश्‍यकता असते. प्रतिहेक्‍टरी व्हीएसआयनिर्मित मल्टिमायक्रोन्युट्रीयंट ५ लिटर आणि मल्टिमॅक्रोन्युट्रीयंट ५ लिटर ही द्रवरूप खते प्रती ५०० लिटर पाण्यात मिसळून एकत्रित पहिली फवारणी लागणीनंतर ६० दिवसांनी आणि पुन्हा दोन्ही प्रतेकी ७.५ लिटर द्रवरूप खते प्रती ७५० लिटर पाण्यात मिसळून दुसरी फवारणी ९० दिवसांनी केली असता उत्पादनात वाढ होते.

३) हेक्‍टरी २५ किलो व्हीएसआय मायक्रोसोलची मात्रा द्यावी. हे विद्राव्य खत दोन पध्दतीने देता येते. हे खत सेंद्रीय आम्लयुक्त असून पाण्यात पूर्णपणे विरघळणारे असल्यामुळे ठिबक सिंचन आणि जमिनीत देण्यास उपयुक्त आहे. ठिबक संचाद्वारे प्रत्येक वेळी हेक्‍टरी ६.२५ किलो प्रती २५० लिटर पाण्यात विरघळून लागणी वेळी, लागणीनंतर ६० दिवसांनी, १२० दिवसांनी आणि १८० दिवसांनी असे चार वेळा सोडावे. ठिबक संच नसल्यास शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून लागणीचे वेळी हेक्‍टरी १२.५ किलो आणि ऊस बांधणीचे वेळी १२.५ किलो या प्रमाणात जमिनीत चळी घेऊन द्यावे.

४) ऊस हे पीक जमिनीतून ५०० ते ७०० किलो सिलीकॉन जमिनीतून घेते. जमिनीत सिलीकॉनचे प्रमाण जरी जास्त असले तरी ते रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या संशोधनानुसार लागणीच्या वेळी प्रती हेक्‍टर १.५ टन बगॅसच्या राखेमध्ये २.५ लिटर सिलीकेट विरघळविणाऱ्या जिवाणू खताचा वापर करावा.

----------

माहिती आणि संशोधन - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे

(An initiative by Salam Kisan.) 

(सलाम किसान हे सुपर अॅप असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सेवा व उत्पादने उपलब्ध करून दिली जातात.) 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT