Farming Losses: खडकवासला कालव्याचे उन्हाळी आवर्तन न मिळाल्याने इंदापूर तालुक्यातील ३६ गावांतील पिके जळून खाक झाली आहेत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात आंदोलनांची मालिका सुरू केली आहे. पाण्यासाठी १८ मे रोजी रास्ता रोको केल्यानंतर आता ३ ते ५ जूनदरम्यान पाणी देण्याचे आश्वासन मिळाले असले, तरी अद्याप कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे..खडकवासला कालव्याच्या पाण्याअभावी उसासारखी नगदी पिके हातची गेल्याने शेतकऱ्यांचे सुमारे ७० कोटींचे नुकसान झाले आहे. या प्रश्नावर १८ मे रोजी पुणे-सोलापूर महामार्गावर आंदोलन करणाऱ्या २०० ते २५० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. .Irrigation Water Crisis: बंधारे तळाला; गोदापात्रात पाणी सोडा.त्यानंतर २५ मे रोजी सिंचन भवनासमोर झालेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने ३ जूनपासून पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप कालवा कोरडाच आहे. दुसरीकडे, कर्मयोगी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूकदार आणि शेतकऱ्यांची थकबाकी रखडल्याने कारखान्याच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन सुरू आहे..Water Wastage: ऐन टंचाईत पाण्याची नासाडी.अर्थकारण कोलमडलेउजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी कमी झाल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. जळालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून एकरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी विजय गावडे व जनार्दन पांढरमिसे यांनी केली आहे. .कृषिमंत्र्यांच्याच तालुक्यात शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.