Varai Cultivation Agrowon
ॲग्रो गाईड

Varai Cultivation : कमी पाण्यात येणाऱ्या वरईची लागवड कशी करावी?

Bhagar Cultivation : वरई या पिकाला चिना, वरई, वरी, भगर असेही म्हणतात. हे कमी दिवसांत लवकर वाढ होणारे पीक आहे. तृणधान्य वर्गातील हे पीक अत्यंत कमी पाण्यावर येते.

Team Agrowon

Millet Crop : वरई या पिकाला चिना, वरई, वरी, भगर असेही म्हणतात. हे कमी दिवसांत लवकर वाढ होणारे पीक आहे. तृणधान्य वर्गातील हे पीक अत्यंत कमी पाण्यावर येते. नागली वगळता इतर पर्वतीय तृणधान्यावर प्रक्रिया करून त्यापासून भगर करतात. भगर तयार करण्यासाठी प्रामुख्याने वरई, सावा, बर्टी व कोद्रा या धान्याचा वापर करतात. भगर तयार करण्यासाठी उपयोगात आणलेल्या धान्यावरून भगरीचे प्रकार पडतात. उदा. वरई भगर, सावा भगर, बर्टी भगर व कोद्रा भगर. वरई भगर सर्वांत उच्च प्रतीची असून, बाजारभाव चांगला मिळतो. कोद्रा भगर सर्वांत हलक्‍या प्रतीची समजली जाते व बाजारभाव कमी मिळतो.

वरईची पेरणी तीनही हंगामात  करता येते.  वरईची जुलै महिन्यात पेरणी करावी. उशिरात उशीरा सप्टेंबर महिन्यापर्यंत पेरणी करता येते. खरीप हंगामात लागवड करण्यासाठी गादी वाफ्यावर पेरणी करून नंतर रोपांची पुनर्लागवड करावी. पुनर्लागवड पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास ५ किलो प्रति हेक्‍टरी बियाणे पुरेसे होते. ओळीत पेरणी करावयाची झाल्यास १० किलो प्रति हेक्‍टरी आणि फोकून पेरणी करावयाची झाल्यास १५ किलो प्रति हेक्‍टरी बियाणे लागते.

एक ते दीड मीटर रुंद, ८ ते १० सें.मी. उंच आणि उतारानुसार लांबी ठेवून गादी वाफे तयार करावेत. ७ ते ८ सें.मी. अंतरावर ओळीत १ ते २ सें.मी. खोल बियाणे पेरून झाकावे. पेरणीपूर्वी व पेरणीनंतर प्रति गुंठा एक किलो युरिया द्यावा. अशा पद्धतीने लागवड केल्यास ३० ते ३५ दिवसांत रोपे लागवडीस तयार होतात. ५ ते ७ गुंठे क्षेत्रावर केलेल्या रोपवाटिकेतील रोपे एक हेक्‍टर क्षेत्र लागवडीस पुरेशी होतात.

सुधारीत जाती कोणत्या आहेत?

के-१  ः हलक्‍या जमिनीत येणारी मध्यम उंचीची हळवी जात.

जीपीयूपी-२१ ः मध्यम जमिनीत कमी ते मध्यम पावसात प्रतिसाद देणारी निमगरवी जात.

खत व्यवस्थापन 

हे पीक नत्र खतास चांगला प्रतिसाद देते. हेक्टरी २ ते ३ टन शेणखत द्यावे. माती परीक्षणानुसार २० किलो नत्र व २० किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी द्यावे. पुनर्लागवडीच्या वेळी हेक्‍टरी १० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद द्यावे. उर्वरित ५० टक्के नत्राचा हप्ता (१० किलो नत्र) पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांच्या अंतराने द्यावा. लागवडीचे अंतर ः दोन ओळीत २५ सें.मी. आणि दोन रोपांतील १० सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Dealers Strike: कृषी निविष्ठा विक्रेते संपावर

Fertilizer Dealers Protest: विदर्भात कृषी विक्रेत्यांच्या संपाला शंभर टक्के प्रतिसाद

Tendu Leaf Collection: तेंदुपत्त्याच्या ३० हजार गोणींच्या संकलनाचे उद्दिष्ट

Summer Livestock Health Safety: उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क

Chana Procurement: मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर ९५ हजार क्विंटल हरभरा खरेदी

SCROLL FOR NEXT