Parbhani News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत विमा योजनेत यंदाच्या (२०२५) खरीप हंगामात बुधवारी (ता. १३) सकाळपर्यंत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ४ लाख १४ हजार ३१७ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे ८ लाख ९ हजार ३३२ विमा अर्ज भरले आहेत. .शेतकऱ्यांनी स्वहिश्श्याचा ५७ कोटी २ लाख रुपये विमा हप्त्याचा भरणा करत ५ लाख २६ हजार ८६० हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार ९९६ कोटी ५१ लाख रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीकविम्याचे अर्ज भरण्यासाठी गुरुवारपर्यंत (ता. १४) मुदत आहे..Crop Insurance: पीकविमा परतावा मंजुरीत लोहा, कंधारला ठेंगा.परभणी जिल्ह्यातील २ लाख ८१ हजार २६८ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे ५ लाख ४६ हजार १०८ अर्ज भरले आहेत. यंदाच्या ४ लाख ९९ हजार १८३ हेक्टरवर (९६.२८ टक्के) पेरणी क्षेत्रापैकी ३ लाख ६५ हजार ८६० हेक्टरवरील पिकांसाठी २ हजार ८३ कोटी ३४ लाख रुपये एवढ्या रकमेचे विमा संरक्षण घेतले आहे. शेतकऱ्यांनी स्वहिश्श्याचा ४० कोटी २५ लाख १७ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे. शेतकरी, राज्य, केंद्र सरकार यांचा मिळून एकूण २९० कोटी ९४ लाख रुपये विमा हप्ता आहे..Crop Insurance: विमा भरपाईचे ४१५ कोटी आठवडाभरात मिळणार.हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ४९ शेतकऱ्यांनी पीकविम्याचे २ लाख ६३ हजार २२४ अर्ज भरले आहेत. यंदाच्या ३ लाख ५२ हजार २६ हेक्टरवर (८७.७८ टक्के) पेरणी क्षेत्रापैकी १ लाख ६१ हजार हेक्टरवरील पिकांसाठी ९१३ कोटी १७ लाख रुपयाचे विमा संरक्षण घेतले आहे. शेतकऱ्यांनी १६ कोटी ७७ लाख रुपये विमा हप्ता भरला आहे. शेतकरी, राज्य, केंद्र सरकार मिळून एकूण १३६ कोटी ७ लाख रुपये विमा हप्ता आहे..परभणी जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या तर हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकांसाठी विमा योजना लागू आहे. विशेष बाब म्हणून पीकविम्याचे अर्ज भरण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना गुरुवारपर्यंत (ता. १४) तर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.