Sangli News : सांगली जिल्ह्यात यंदा सततचा पाऊस आणि सोयाबीन, सूर्यफूल, आणि भुईमुगाला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या तीनही पिकांच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे चित्र आहे. यंदाच्या खरीप हंगामात ९३ टक्के पेरा झाला आहे..जिल्ह्यात प्रामुख्याने जत तालुका वगळता सर्व तालुक्यांत सोयाबीन पेरणी होते. जत आणि आटपाडी तालुक्यांत सूर्यफुलाची पेरणी केली जाते. यामध्ये सर्वाधिक पेरणी जत तालुक्यात होते. भुईमुगाची सर्वच तालुक्यात शेतकरी लागवड करतात..Kharif Sowing 2025 : कापूस, सोयाबीन, तुरीकडे शेतकऱ्यांची पाठ; मक्याला मात्र पसंती.यंदाच्या खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ४६ हजार ११८ हेक्टर असून, २ लाख २७ हजार ३८६ हेक्टरवर पेरा झाला आहे. यंदा मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पेरण्या उशिरा सुरू झाल्या. खरिपातील क्षेत्र घटेल अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या..Kharif Crop : सोयाबीन, कापूस जोमात; दमदार पावसाची गरज.गतवर्षीच्या खरिपात भुईमुगाची ३१ हजार ४१५ हेक्टर, सूर्यफूल ११६० हेक्टर आणि सोयाबीनची ३५ हजार ९५२ हेक्टरवर पेरा झाला होता. यंदा भुईमुगाची २९ हजार ९६४ हेक्टर, सूर्यफूल ५१५ हेक्टर तर सोयाबीनची ३२ हजार २४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदाच्या हंगामात भुईमुगाचे १४५१, सूर्यफुलाचे ६४५, सोयाबीनचे ३ हजार ७०३ हेक्टरने क्षेत्र घटले आहे. यंदा सततच्या पावसामुळे या पिकांच्या पेरणीला अडथळे निर्माण झाले होते. .त्याचा परिमाण तेलबियांच्या पेरणीवर झाला आहे. त्यातच या पिकांना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून मका पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. प्रामुख्याने दुष्काळी भागात मक्याची लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहे. गतवर्षी खरिपात ४८ हजार ९६२ हेक्टरवर लागवड झाली होती..पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टर)भात ९२२४ज्वारी १७०५१बाजरी ४४४९८मका ४९७३५तूर ११७६३मूग ४७४८उडीद १९९२५ .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.