Cotton Cultivation : कापूस सघन लागवड पद्धतीत वाणाची निवड कशी करावी?

Team Agrowon

सघन कापूस लागवड पद्धत म्हणजे काय?

सघन कापूस लागवड पद्धत म्हणजे कपाशीची लागवड कमी अंतरावर करून हेक्टरी झाडांची संख्या म्हणजेच घनता वाढविणे.

Cotton Cultivation | Agrowon

लागवडीतील अंतर

सघन लागवड पद्धतीमध्ये कापूस लागवडीत योग्य अंतर राखले जाते. अनुरूप वाणांची निवड करुन पिकाची वाढ नियंत्रित ठेवली जाते. त्यासाठी वाढ व्यवस्थापन आणि वाढविलेल्या झाडांच्या संख्येसाठी पुरेसा अन्नद्रव्यांचा पुरवठा या बाबींवर लक्ष केंद्रित करावे लागते.

Cotton Cultivation | Agrowon

रोपांची संख्या

सघन कापूस लागवडीत रोपांची संख्या वाढविण्यासाठी लागवडीचे अंतर कमी करायचे असते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनानुसार बीटी कापूस वाणांच्या लागवडीसाठी ९० बाय ३० सेंटीमीटर म्हणजेच ३ बाय १ फूट अंतराची शिफारस केलेली आहे.

Cotton Cultivation | Agrowon

प्रती झाड उत्पादन

पारंपरिक लागवड पद्धतीपेक्षा सघन लागवडीमध्ये एकरी झाडांची संख्या दुप्पट ते चारपट राहते. या सघन लागवडीमध्ये एका झाडाला सरासरी २० बोंडे लागतील, असे अपेक्षित आहे.

Cotton Cultivation | Agrowon

संकरित वाण

सामान्यपने बीटी कापूस लागवडीमध्ये दीर्घ कालावधीची, जास्त वाढ असणारी आणि खत व सिंचनास प्रतिसाद देणारी संकरित वाण मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

Cotton Cultivation | Agrowon

वाणं निवड

सघन लागवडीत आटोपशीर ठेवण असणारी वाणं निवडणे आवश्यक आहे. म्हणजेच असे वाण की ज्यांच्या फांद्यांची लांबी आणि झाडाची उंची कमी आहे.

Cotton Cultivation | Agrowon

वाणाची उपलब्धता

बाजारातील बहुतांश वाण या निकषांमध्ये बसत नाहीत. काही निवडक कंपन्यांचे विशिष्ट वाणच सघन लागवडीस उपयुक्त आहेत.

Cotton Cultivation | Agrowon

उंची आणि फांद्यांची लांबी कमी असणारे वाण

सघन लागवडीसाठी उंची आणि फांद्यांची लांबी कमी असणारीच वाण निवडावीत.

Cotton Cultivation | Agrowon
Cotton Cultivation | Mukund Pingale