Kolambi Fish Farming Agrowon
ॲग्रो गाईड

Kolambi Fish Farming : कोळंबी बिज संवर्धनासाठी संगोपन तलावाचे व्यवस्थापन कसे कराल?

कोळंबी बीजउत्पादन केंद्रात उपलब्ध होणाऱ्या पोस्ट लार्व्हा अवस्थेतील बीजाला ६ ते ८ आठवड्यापर्यंत उत्तम प्रतीचे नैसर्गिक खाद्य आणि पूरक खाद्य देऊन योग्य जागेमध्ये वाढवणे गरजेचं असते.

Team Agrowon

चांगल्या प्रतीच्या बीजाची उपलब्धता कोळंबी संवर्धनामध्ये महत्त्वाची आहे. संगोपन तलावात १ ते २ ग्रॅमपर्यंत वाढलेले कोळंबीचे बीज पकडून तलावात साठवले जाते.

कोळंबी बीजउत्पादन केंद्रात उपलब्ध होणाऱ्या पोस्ट लार्व्हा अवस्थेतील बीजाला ६ ते ८ आठवड्यापर्यंत उत्तम प्रतीचे नैसर्गिक खाद्य आणि पूरक खाद्य देऊन योग्य जागेमध्ये वाढवणे गरजेचं असते. यालाच नर्सरी किंवा संगोपन व्यवस्थापन म्हटले जाते.

संगोपन तलावाचे व्यवस्थापन

- या तलावांचे आकारमान ०.०२ ते ०.१ हेक्टर असावे लागते. तलावात पाणी आत घेण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र मार्ग असावेत.

यामुळे कोळंबी बीजाची वाढ जलद होऊन मरतुकीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

- संगोपन तलावातून कोळंबीचे बीज काढल्यानंतर प्रत्येक वेळेस संगोपन तलावातून पाणी पूर्णपणे काढून घ्यावे. पाणी आत येण्याचे आणि बाहेर जाण्याचे मार्ग स्वच्छ करून बंद करावेत. तलावाचा तळ भेगा पडेपर्यंत दोन ते तीन आठवड्यापर्यंत कडक उन्हामध्ये सुकवून घ्यावा. असे केल्याने होणारे फायदे पुढीलप्रमाणे-

- हायड्रोजन सल्फाईड, अमोनिया व मिथेन यासारखे विषारी वायू जे कोळंबीच्या बीजासाठी अपायकारक असतात, ते वातावरणामध्ये निघून जातात.

- भक्षक प्राण्याची अंडी, अळ्या तसेच शेवाळ आणि पाणवनस्पतीच्या बीजाचा नायनाट होतो.

- आधीच्या संगोपन व्यवस्थापनात तळावर जमा झालेले मृत व कुजलेले सेंद्रिय पदार्थ यांचे विघटन होऊन पुढील संगोपनाकरिता चांगले खत तयार होण्यास मदत होते.

- तलाव सुकल्यानंतर ३ ते ४ दिवसांच्या अंतराने तलाव दोनदा नांगरावा.

- तलावातील मातीचा सामू तपासाा. मातीच्या सामूनुसार तलावात पुढील प्रमाणात चुना पसरावा.

- तलावाचा तळ एकसारखा सपाट करून पाणी बाहेर जाणाऱ्या जागेकडे थोडासा उतारा करावा. सुरवातीला तलाव १/४ पाण्याने भरावा. योग्य प्रमाणात खतांची मात्रा द्यावी. त्यामुळे तलावाच्या तळापर्यंत सूर्यप्रकाश पोहचून प्लवंग निर्मितीस सुरुवात होते. पाण्याचा रंग जर फिक्कट हिरवा, निळसर हिरवा किंवा तपकिरी हिरवा झाला तर तलावात चांगल्या प्रमाणात नैसर्गिक खाद्याची म्हणजेच प्लवंगाची निर्मिती झाली आहे, असे समजावे. त्यानंतर तलावात १ ते १.२ मीटर पाणी भरावे.

Land Dispute : ‘एनएमआरडीए’च्या कारवाईला हायकोर्टाचा दणका

Agriculture Mortgage Loan : लासलगाव बाजार समितीमध्ये शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू

Onion Market : आठवड्याहून जास्त काळ बाजार समित्यांचे काम राहणार बंद

APMC Land : बाजार समितीची जमीन कवडीमोलाने विकण्याचा घाट

Palm Cultivation: यंदा देशातील पाम लागवड क्षेत्रात ५२,११३ हेक्टरने वाढ, 'या' राज्यांत सर्वाधिक

SCROLL FOR NEXT