Soybean Harvesting  Agrowon
ॲग्रो गाईड

Soybean Harvesting : योग्य वेळी करा सोयाबीनची काढणी

Radhika Mhetre

Soybean Cutting : सध्या सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आहे. येत्या काही दिवसात सोयाबीन काढणीला वेग येणार आहे. योग्य वेळी जर सोयाबीनची काढणी केली नाही तर बियाण्यांची प्रत खालावण्याची शक्यता असते. सोयाबीन बियाण्याचे आवरण हे अत्यंत पातळ व नाजूक असते. त्यामुळे अन्य पिकाच्या तुलनेत सोयाबीनचे बियाणे लवकर खराब होऊ शकते.

त्याचा उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊन सोयाबीनची कापणी व मळणी करावी. कापणी, मळणी, प्रक्रिया व साठवणुकीदरम्यान पुढील प्रकारे काळजी घेतल्यास बियाण्याची उगवणशक्ती चांगली ठेवता येईल.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कापणी करताना काय काळजी घ्यायची?

-सोयाबीनची पाने पिवळी पडून गळू लागल्यावर व शेंगाचा रंग भुरकट, तांबूस किंवा काळपट झाल्यानंतर पीक कापणी करावी. वाणाच्या परिपक्वता कालावधीनुसार (कमी/अधिक ३ दिवस), साधारणत: ८० ते ८५ टक्के शेंगा वाळल्यानंतर पिकाची कापणी करावी.

-कापणीच्या वेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ ते १७ टक्के असावे.

-पावसाचे वातावरण असल्यास किंवा वातावरणात जास्त आर्द्रता असल्यास सोयाबीनची कापणी टाळावी.

-कापणी झाली असल्यास गंजी ताडपत्रीने व्यवस्थितपणे झाकावी. तसेच दुपारच्या वेळी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास ताडपत्री काढून गंजी फोडून सुकू द्यावी. त्यामुळे शेंगेतील दाणे कुजणार नाहीत.

-वाण व प्लॉटनिहाय वेगवेगळी कापणी व मळणी करावी.

-ओल्या झाडांची गंजी लावू नये. गंजीमध्ये ओले किंवा हिरवे झाडे ठेवू नये.

मळणी करताना काय काळजी घ्यायची?

-कापलेले पीक मळणी खळ्यावर आणून सुकू द्यावे. त्यामुळे दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ ते १३ टक्क्यांपर्यंत येईल.

-मळणी करण्याची जागा व मळणी यंत्र स्वच्छ करून घ्यावे.

-विशेषतः मळणीवेळी अन्य कोणत्याही वाणाची भेसळ होणार नाही, याची काळजी घ्यावी.

-सोयाबीनची मळणी करताना दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ ते १३ टक्के असावे. मळणी यंत्राच्या ड्रमची गती ३५० ते ४०० फेरे प्रति मिनीट (आर. पी. एम.) या दरम्यान ठेवावी. त्यामुळे बियाण्याला इजा पोहोचणार नाही. उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होत नाही. मळणी यंत्राचे फेरे मोजण्यासाठी पॉकेट टॅकोमीटर बाजारात उपलब्ध आहे, त्याचा वापर करावा.

-मळणी करताना मळणी यंत्रामध्ये सोयाबीन लावण्याचा वेग एकसारखा असावा, त्यामुळे बियाण्याला मार लागणार नाही.

-जर मळणी करताना बियाण्याची फूट होत असेल, तर थ्रेशिंग ड्रममधील काही स्टड/नट कमी करावेत.

-तयार झालेले बियाणे ओलसर असल्यास सारखे पसरून उन्हात चांगले वाळवावे. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत खाली आल्यास वाळवणे थांबवावे. बियाण्यात ओलाव्याचे प्रमाण जास्त असल्यास बियाणे जास्त तापमानात वाळवू नये, यामुळे उगवणक्षमता झपाट्याने कमी होते.

बियाण्यात जास्त ओलावा असेल तर बियाणे उन्हात न वाळवता सावलीत हवेशीर जागी वाळवावे. बियाणे उन्हात वाळवतेवेळी पक्क्या फरशीवर न वाळवता पातळ ताडपत्रीवर वाळवावे.

-----------

माहिती आणि संशोधन - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

Interview with Manikrao Khule : ऑक्टोबरमध्ये पाऊस दणका देणार का?

Village Story : खपली

Processing Industry : प्रक्रिया उद्योगाला मिळाली महिलांची साथ

SCROLL FOR NEXT