Soybean Production : सोयाबीन उत्पादन, दर कमी; सोंगणी, मळणी महागली

Soybean Harvesting : या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीला येऊ लागले आहे. पुढील १५ दिवसांत हा हंगाम जोमाने सुरु झालेला असेल.
Soybean
Soybean Agrowon
Published on
Updated on

Akola News : या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीला येऊ लागले आहे. पुढील १५ दिवसांत हा हंगाम जोमाने सुरु झालेला असेल. सध्या सोयाबीनचे पीक अनेक ठिकाणी परिपक्व होऊन काढणीसाठी तयार होत आहे.

उत्पादकता व दरात घट असून एक सोंगणीची मजुरी मात्र एकरी ३५०० रुपयांपर्यंत पोचली आहे. हार्वेस्टरने काढणीसह मळणीचा दरही वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर सर्व बाजूंनी आर्थिक नुकसानीचे संकट आहे.

पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत सुमारे नऊ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर यंदा सोयाबीनची लागवड झाली. जूनमध्ये लागवड झालेल्या भागातील सोयाबीनची काढणी सुरु झाली. जुलैतील हे पीक पुढील १५ दिवसानंतर काढणीला येणार आहे. साधारणतः दसऱ्यानंतर सोयाबीनचा हंगाम शिगेवर पोचू शकतो.

Soybean
Soybean Disease : ‘येलो मोझॅक’, ‘मूळ-खोडकुजी’चा हजारो हेक्टरवर प्रादुर्भाव

यासाठी मजुरांच्या टोळ्या ‘अग्रिम’ नोंद करून ठेवण्यास सुरवात झाली. मजुरांमार्फत सोयाबीन सोंगणीचा एकरी दर कुठे ३००० रुपये, कुठे ३२०० तर काही भागात ३५०० रुपये मागितला जात आहे. सरासरी तीन हजार रुपयांवर एकराचा कापणी दर पोचला आहे.

याद्वारे कापणी व पीक एका जागेवर ढीग करून देण्याचे काम होते. त्यानंतर मळणीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रासाठी प्रतिक्विंटल २०० रुपयांपर्यंत दर द्यावा लागतो.

गेल्या वर्षात कापणीचा दर २८०० पर्यंत होता. तर मळणीसाठी १५० रुपये प्रति पोते घेतले जात होते. यावर्षी दोन्ही दर वाढले आहेत. हार्वेस्टरने काढणीचा दर एकरी ३००० रुपयांपर्यंत आहे. कर्नाटक, पंजाब, हरियानातून हार्वेस्टर या भागात दाखल होऊ लागले आहेत. स्थानिक काही व्यावसायिकांनीही ही यंत्रे घेतलेली आहेत.

Soybean
Soybean Market Rate : शेती सरकारला लिहून द्यायची वेळ

उत्पादकतेत मोठी घट

पावसाचा खंड, पिकावर आलेला पिवळा मोझॅक, मूळ, खोड कुजीमुळे २५ ते ५० टक्के उत्पादनाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. हलक्या प्रतीच्या जमिनीतील सोयाबीनचे उभे पीक वाळून गेले आहे. या झाडांवरील सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाण्यांची संख्या व वजनही कमी आहे. त्यामुळे उत्पादकता एकरी पाच ते आठ पोत्यांदरम्यान राहील, असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

दर घसरले

नवीन सोयाबीनची आवक बाजारात सुरु होणार असल्याने दर साडेचार हजारांपर्यंत खाली आला आहे. सध्या अकोला बाजार समितीत सरासरी ४३०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. बुधवारी (ता. ४) येथील बाजारात किमान ३५०५ व कमाल ४५९० रुपये दर मिळाला. नवीन सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाल्यानंतर हा दर किती मिळतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

यावर्षी सोयाबीन कापणीचे दर वाढले आहेत. मजूर ३५०० रुपये प्रति एकराने सौदे करण्याचा आग्रह करीत आहेत. मळणीचा दरही २०० रुपये पोते झाला आहे. या वर्षी दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यामुळे उत्पादनात घट आहे. दरही कमी आहेत. त्यामुळे केलेला खर्च तरी मिळतो का, याची चिंता आहे.
- शुभम खडसे, शेतकरी, शेलुखडसे, ता. रिसोड, जि. वाशीम.
मागील वर्षी २८०० रुपये एकरी मजुरी होती. यावर्षी ३३०० रुपये मागत आहेत. मळणीचा दर १५० वरून यंदा २०० रुपये झाला आहे.
- प्रभाकर खुरद, भोसा, ता. मेहकर, जि. बुलडाणा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com