ॲग्रो गाईड

दोन रुपड्याचं फटांगडं...

तरीही मी दुसऱ्या दिवशी उठून पारुस्या तोंडानं पोरांनी रात्री वाजवलेल्या फटाक्यांच्या रिकाम्या पुंगान्या, फुसके फटाके गोळा करून घरी आणायचो, ते खोलून त्यातली दारू दगडावर गोळा करून चुलीतल्या विस्तवानं ती पेटवायचो.

टीम ॲग्रोवन

मला फटाके आवडायचे पण ते विकत घेऊन देण्याची आईची ऐपत नव्हती. त्यामुळे प्रत्येक दिवाळीत फटाक्यांचा आवाज हा कानांपेक्षा तिच्या मनाला जास्त त्रास द्यायचा. बाहेर जाऊन मी लुखु नये म्हणून ती मला दिवाळीत जास्त कामं सांगून घरातच गुंतवायची. तरीही मी दुसऱ्या दिवशी उठून पारुस्या तोंडानं पोरांनी रात्री वाजवलेल्या फटाक्यांच्या रिकाम्या पुंगान्या, फुसके फटाके गोळा करून घरी आणायचो, ते खोलून त्यातली दारू दगडावर गोळा करून चुलीतल्या विस्तवानं ती पेटवायचो.

त्या दारूचा वास अन् त्याचा सुरसुर असा आवाज मला फार आनंद देऊन जायचा. हा सगळा उद्योग पाहून आई मला एकदा म्हणाली, ‘‘बबु, कशाला रं लोकांचं उकरीडं फुकित बस्तो त्या फटांगड्यापायी’’ ‘‘आगं, मंग मला दोन रुपडे द्ये की, लक्ष्मी नाहयी त लवंगीची तरी एखादी लड घेऊन वाजवू दे...’’ “आरं, फटांगडं फोडून मानुस आजून गरीब व्हत जातो रं.” ‘‘कस्काय गं?’’ “मला याक सांग, म्या जर आता तुला दोन रुपयाची नोट दिली, तर ती तू पेटवून जाळशील का?’’ ‘‘नाह्यी गं, मी काय येडाबिडा हाये का?’’ ‘‘नाह्यी ना येडा, मंग दोन रुपड्याचं फटांगडं घेऊन ते जर त्वा वाजावले तर नोट जाळून टाकल्यासारखंच हाये का नाय?’’ ‘‘व्हय, व्हय आई.’’ त्यामुळे आजपर्यंत मी कधीच फटाके वाजवलेच नाहीत. तिच्या प्रत्येक कृती वाक्यामागं तिची अगतिकता जाणवायची.

स्वतःच्या कंबरेच्या पिशवीत जेवढे पैसे तेवढीच आपली ऐपत अन् तितकीच श्रीमंती असं ती पदोपदी म्हणायची. आपण केलेल्या कामाची मजुरीसुद्धा लोकं वेळेवर देत नाहीत, मग आपल्याला फुकट पैसे कोण देणार? ती असं काही बोलायची ना, की एखादा बुवा जेवढं मार्गदर्शन करत असेल, त्याहून जास्त मशागत माझ्या मेंदूची माझी आई करायची.

कधी कधी तिचा राग यायचा. वाईटही वाटायचं. तिच्या दृष्टीने वायफळ असणाऱ्या गोष्टी या माझ्या बालमनाला मात्र आकर्षित करायच्या. त्यापासून मला परावृत्त करताना ती अनेक दाखले द्यायची. मात्र पोटाला चिमटा घेऊन घर जगवणारी आई ही शाळेच्या बाबतीत मात्र सावित्रीमाय बनून माझ्यामागं खंबीरपणे उभी राहून म्हणायची,

‘‘बाळा, तुपली ही साळाच एक दिस आप्लि गाडी ह्या गरिबीच्या गाळातून बाहीर काढीन पघ, त्यामुळं मपली मजुरी साळंसाठी खर्ची पडल्याव मला कव्हाच वाईट नाही वाटंत पघ.’’ आई अजिबात शिकली नव्हती, पण तिनं जगण्यावर पीएचडी मात्र केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Alert: मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता

Rain Crop Damage: पावसामुळे १४९० हेक्टरला फटका

Milk Regulation: उत्पादक, विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक

Unseasonal Rain Impact: पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच

Pesticide Price Increase : कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता; पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

SCROLL FOR NEXT