Indian Agriculture : शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील कर्मचाऱ्यांचे कापणार वेतन

अनुदानवाटपात हयगय करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांचे सात दिवसांचे वेतन कापण्यासोबतच सेवापुस्तिकेत नोंद घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित खात्याच्या विभाग प्रमुखांना दिले आहेत.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

यवतमाळ ः अनुदान (Government Aid) वाटपात हयगय करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांचे सात दिवसांचे वेतन कापण्यासोबतच सेवापुस्तिकेत नोंद घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे (Amol Yedge) यांनी संबंधित खात्याच्या विभाग प्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे जबाबदारीची ढकलाढकली करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जुलै ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडविला. उभ्या पिकाचे नुकसान झाले, तर काही भागांत जमीन खरडून गेल्या. या बाधित शेतकऱ्यांच्या शेताचे सर्व्हेक्षण व पंचनामे करण्यात आले. मदतनिधीचा प्रस्ताव जिल्हास्तरावरून शासनाला पाठविण्यात आला. त्याआधारे मदतही जाहीर झाली. निधी प्रशासनाकडे पोचला. त्याचवेळी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी आडमुठेपणाची भूमिका घेत मराठीतील याद्या इंग्रजीत करण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखविणे सुरू केले.

Indian Agriculture
Indian Agriculture : गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदासाठी फुटले भाव

त्यानंतरच्या कालावधीत कामावरील बहिष्काराचे हत्यार उपसण्यात आले. परिणामी ९ तालुक्‍यांतील अशा इंग्रजी याद्या अद्यापही तयार झाल्या नाहीत. त्यामुळे मदतनिधीचे वितरणही या तालुक्‍यांमध्ये प्रभावित झाले आहे. दिवाळी तोंडावर असल्याने ती मदत निधी खात्यात गेल्यास काहीशी गोड होणार होती. त्यामुळे गुरुवार (ता.२०)पर्यंत या निधीचे वितरण व्हावे व तसा अनुपालन अहवाल सादर करण्याचे

निर्देश देण्यात आले होते. परंतु त्यानंतरही काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांप्रती असंवेदनशीलता जपत हे काम करण्यावर बहिष्कार कायम ठेवला. त्यांचे सात दिवसांचे वेतन कापण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल सेवापुस्तिकेत नोंद घेतली जाणार आहे. या आदेशामुळे यंत्रणा ताळ्यावर आली असून, कामाला गती देण्यात आली आहे. परंतु त्यानंतरही हजारो शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com