Jalkot News: जळकोट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्त झालेले शेतकरी सण काळात आर्थिक चणचणीमुळे हवालदिल झाले आहेत. त्यांना शासकीय मदतीसह हक्काच्या पीकविमा मंजुरीची प्रतीक्षा आहे..तालुक्यात खरिपाचे २९ हजार हेक्टर्स पेरणीक्षेत्र असून, महागडे बी-बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करून शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. एकीकडे पेरणीचा खर्च तर दुसरीकडे मशागतीसह कीटकनाशक, तणनाशक फवारण्या करून शेतकरी आपल्या पिकाकडे रात्रंदिवस आशेने पाहत असतानाच ढगफुटीसदृश पावसाने होत्याचे नव्हते केले..Crop Insurance : विमा भरला १५ हजार अन् मिळाले ५९९४ रुपये .त्यामुळे खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या बाजूने शासनाने खंबीरपणे उभा राहून चांगली मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..तालुक्यात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार रोहित पवार, आमदार संजय बनसोडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी यांचे पाहणी दौरे झाले. स्थानिक नेत्यांसह पदाधिकारी, पक्षश्रेष्ठी, नेते आदींनी पीक नुकसानीची पाहणी करून अडचणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. परंतु, अद्याप मदत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही..Fruit Crop Insurance : आंबा, काजू पीक विमा परताव्यावरून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम.शासनाने मदत तुटपुंज्या स्वरूपात न करता शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन मदत करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, पीकविमा कंपनीने निकष बदलले असल्याने विमा मंजुरीबाबत चिंता आहे..शासनाने नुकसानीची पाहणी करून पंचनामे वरिष्ठांकडे सादर केले असून, २० हजार पैकी १५ हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोडचे काम पूर्ण झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पीकविमा कंपनीने शासनाचे पडताळणी पंचनामे मान्य करून उशीर न लावता पीकविमा तातडीने मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी आहे..अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल पाठवला असून, त्यानुसार २० हजार शेतकऱ्यांपैकी १६ हजार शेतकऱ्यांचे अपलोडचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे अनुदान खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे. ॲग्रिस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी खाते नंबर दिला नसल्यास तलाठ्यांशी संपर्क करावा. तसेच पीकविम्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व विमा प्रतिनिधी यांच्या संयुक्त पथकामार्फत पीक कापणी प्रयोग सुरू झालेले आहेत.- संतोष गुट्टे, नायब तहसीलदार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.