Dry Fruits: दिवाळीत सुकामेव्याचे दर गगनाला, खोबरे दर दुप्पट
Price Hike: दिवाळी सण आणि वाढती थंडी यामुळे सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाली असली, तरी भाववाढीमुळे ग्राहकांना चांगलाच फटका बसला आहे. विशेषतः नारळ आणि खोबऱ्याचे दर दुप्पट झाल्याने सणासुदीचा आनंद आता महागाईच्या छायेत साजरा होणार आहे.