Crop Advisory Agrowon
ॲग्रो गाईड

Crop Advisory : कृषी सल्ला ः कोकण विभाग

हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याने ही स्थिती पाहून आंबा, काजू बागेतील कीड, रोग नियंत्रणासाठीच्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्यांचे नियोजन करावे.

टीम ॲग्रोवन

विशेष सल्ला ः

हलक्या ते मध्यम पावसाची (Rainfall) शक्यता असल्याने ही स्थिती पाहून आंबा (Mango), काजू बागेतील (Cashew Pest) कीड, रोग नियंत्रणासाठीच्या कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्यांचे नियोजन करावे.

काजू ः

पालवी ते मोहोर अवस्था

बदलत्या वातावरणामुळे पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानांवर करड्या पिंगट रंगाचे अनियमित आकाराचे ठिपके दिसून येतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते आणि गळून पडतात. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पावसाचे वातावरण निवळल्यानंतर अझॉक्सिस्ट्रोबीन (२३ टक्के प्रवाही) या बुरशीनाशकाची ०.७ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी.

आंबा ः

पालवी ते मोहोर अवस्था

पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आर्द्रतेत वाढ आणि तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालवी, बोंगे फुटण्याची अवस्था, मोहोर कळी, फुललेला मोहोर तसेच कणी अवस्थेतील झाडांवर पाऊस झालेल्या ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे.

प्रादुर्भावामुळे कोवळ्या पालवीवर करड्या तपकिरी रंगाचे खोलगट आणि पिवळसर कडा असलेले डाग दिसून येतात. जास्त प्रादुर्भावामध्ये पाने गळून जातात. करपा रोगामुळे मोहोर तांबूस होऊन वाळतो, फुलगळ होते. लहान फळांवर काळे डाग पडून फळगळ होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पावसाचे वातावरण निवळल्यानंतर अझॉक्सिस्ट्रोबीन (२३ टक्के प्रवाही) ०.७ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी. मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यावर फवारणी घेण्यापूर्वी प्रथम दुपारच्या वेळेस कडक उन्हामध्ये झाडावरील मोहोर झाडून घ्यावा. आणि नंतर फवारणी करावी.

सुपारी ः

पक्वता

पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेली सुपारी सुरक्षित ठिकाणी वाळवावी.

कलिंगड ः

पेरणी ते वाढीची अवस्था

पावसाची स्थिती पाहून कलिंगड लागवड व रोपे नियोजन करावे. पावसामुळे लागवडीनंतर रोपांना मर होण्याची शक्यता असते.

कलिंगड लागवडीतून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.

भाजीपाला पिके ः

पुनर्लागवड ते वाढीची अवस्था

पावसाची शक्यता लक्षात घेता वांगी, मिरची, टोमॅटो भाजीपाला पिकांची पुनर्लागवडीची कामे पुढे ढकलावीत. तसेच भाजीपाला लागवडीमधून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.

वेलवर्गीय भाजीपाला पिकांना मातीची भर देऊन आधार द्यावा.

  ०२३५८ - २८२३८७/ ८१४९४६७४०१

(ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT