Animal Care Agrowon
ॲग्रो गाईड

Animal Care : आला हिवाळा जनावरांना सांभाळा

थंडीच्या दिवसात जनावरांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीमुळे जनावरांमध्ये ताप किंवा पोटाचे आजार वाढतात. अशावेळी जनावरांवर प्राथमिक उपचार करणे आवश्यक असते.

Team Agrowon

नोव्हेबर महिना सुरु झाला तरी अजून म्हणावी तशी थंडीला सुरुवात झालेली नाही. परंतु हवामान अंदाजानूसार येत्या काही दिवसात थंडीची चाहूल लागेल. थंडीच्या दिवसात जनावरांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. थंडीमुळे जनावरांमध्ये ताप किंवा पोटाचे आजार वाढतात. अशावेळी जनावरांवर प्राथमिक उपचार करणे आवश्यक असते. यामध्ये घरच्याघऱी काही उपाययोजना करुन आपण जनावरांचे थंडीपासून संरक्षण करु शकतो. 

हिवाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापन 

थंडीमुळे होणारे दुष्परिणाम 

- हिवाळ्यात पाणी कमी पिण्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते, बऱ्याच वेळा जनावरांचे पोट गच्च होऊन रवंथ कमी होते साहजिकच उत्पादानात घट होते.

- वासरं अतिथंडीमुळे गारठून मृत्युमुखी पडू शकतात.

- अतिथंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात. काही जनावरे लंगडतात. तसेच त्यांची त्वचा खराब होते.

- ऊर्जेची गरज वाढते त्यामुळे जनावरांना या काळात चाऱ्याची जास्त गरज असते चारा कमी पडल्यामुळे उत्पादनामध्ये घट येते.

- कोरडेपनाच्या अभावामुळे  सडावरती चामखीळ या सारखे आजार होवू शकतात त्यामुळ जनावर धार काढताना शातपणे थांबत नही.

उपाययोजना  

- जनावरांना थंडीच्या काळात दुपारी ऊन असताना धुवावे. जनावरांना धुण्यासाठी शक्यतो गरम-कोमट पाण्याचा वापर करा.

- हिवाळ्यात हवामान थंड असल्यामुळे तसेच पाणीही थंड असल्यामुळे जनावर पाणी कमी पिते. जनावरे भरपूर पाणी प्यावेत, यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे.

- या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या हिवाळ्यात वाढणाऱ्या पिकांची लागवड करून चारा उत्पादन घ्यावे. आहारात कडबा व मुरघासाचा वापर करावा.

- जनावराने व्यवस्थित पान्हा सोडण्यासाठी कास धुन्यासाठी आणि वासरांना धुन्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. दुधाळ जनावरांना शक्यतो ज्याठिकाणी एकदम थंड वारे लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावे.

- गोठा रोज धुण्यापेक्षा शक्य तिथे चुन्याचा वापर करावा .

- वासरांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कोरड्या, निर्जंतूक जागेवर ठेवावीत, नवजात वासरासाठी गोणपाटाचा वापर करता येऊ शकतो.

-  सौम्य कोमट पाणी व मिल्क रिप्लेसर देखील कोमट पाण्यामध्ये मिश्रण करून द्यावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT