Election Agrowon
ॲग्रो विशेष

ZP Election : प्रभाग रचनेचा प्रारूप मसुदा जाहीर

ZP Delimitation Draft : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्‍चित करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

Team Agrowon

Buldana News : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्‍चित करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या अनुषंगाने निर्वाचक गण रचनेचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात आला असून, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी तसा आदेश निर्गमित केला आहे.

प्रारूप प्रभाग रचना प्रकाशित करण्यात आली असून, हा मसुदा तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

मसुद्याबाबत कोणतेही आक्षेप किंवा हरकती २१ जुलैपूर्वी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित तहसीलदारांकडे सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मसुद्यानुसार बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६१ निवडणूक गटांची रचना निश्‍चित करण्यात आली असून, तालुकानिहाय विभाग पुढीलप्रमाणे आहेत

जळगाव जामोद तालुका - जामोद, खेर्डा बु., आसलगाव, पिंपळगाव काळे (४ गट)

संग्रामपूर तालुका - सोनाळा, बावणबीर, पळशी झाशी, पातुर्डा बु. (४ गट)

शेगाव तालुका - माटरगाव बु., जलंब (२ गट)

नांदुरा तालुका - निमगाव, वसाडी बु., चांदूरबिस्वा, वडनेर भोलजी (४ गट)

मलकापूर तालुका - नरवेल, मलकापूर ग्रामीण, दाताळा (३ गट)

मोताळा तालुका - पिंप्रीगवळी, कोथळी, धामणगाव बढे, रोहिणखेड, बोराखेडी (५ गट)

खामगाव तालुका - सुटाळा बु., घाटपुरी, अटाळी, अंत्रज, पिंपळगाव राजा, कुंबेफळ, लाखनवाडा बु. (७ गट)

मेहकर तालुका - देऊळगाव साकर्शा, डोणगाव, अंजनी बु., जानेफळ, कळंबेश्वर, देऊळगाव माळी, उकळी (७ गट)

चिखली तालुका - उदयनगर, अमडापूर, इसोली, सवणा, केळवद, मेरा खु., मेरा बु. (७ गट)

बुलडाणा तालुका - देऊळगाव, सुंदरखेड, साखळी बु., मासरुळ, धाड, रायपूर (६ गट)

देऊळगाव राजा तालुका - देऊळगाव मही, सिनगाव जहाँगीर, सावखेड भोई (३ गट)

सिंदखेड राजा तालुका - साखरखेर्डा, शेंदुर्जन, किनगाव राजा, दुसरबीड, वर्दडी बु. (५ गट)

लोणार तालुका - सुलतानपूर, वेणी, बिबी, पांग्रा डोळे (४ गट)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Processing Project: शेतकरी गटाचा धान पट्ट्यात टोमॅटो प्रक्रिया प्रकल्प

Sugaracne Payment: लोकनेते देसाई कारखान्याकडून तीन हजारांची पहिली उचल

Human Wildlife Conflict: बिबट्याला मारायची परवानगी द्या

Yatra Management: कार्तिकी यात्रेदरम्यान मंदिर परिसरात वाहनांना बंदी

NCCF Transport Issue: ‘एनसीसीएफ’ वाहतूक निविदा प्रक्रियेत पक्षपात, अनियमिततेचे आरोप

SCROLL FOR NEXT