Sangli News: गेल्या तीन वर्षांत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती तातडीने सादर करावी, असे निर्देश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. ४ मार्च रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. सन २०२५-२६ या वर्षातील ९ मार्च अखेरपर्यंतची वसुली ग्राह्य धरण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रशासन स्तरावर हालचाली वेगाने सुरू झाल्याचे या आदेशातून स्पष्ट झाले आहे..सहकार आयुक्त व निबंधकांच्या सूचनेनुसार राज्यातील शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्यासाठी विकास व सर्व सेवा सहकारी संस्थांकडून नियमित व थकीत कर्जदारांची माहिती संकलित केली जात आहे. सांगली जिल्ह्यातील एकूण पीक कर्ज वाटपात जिल्हा बँकेचा वाटा ९० टक्क्यांहून अधिक आहे. विकास सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून कर्ज वाटप केले जाते..Farmer Loan Repayment : नियमीत कर्जाची परतफेड करणारे शेतकरी लाभापासून अद्यापही वंचीत.पहिल्या टप्प्यात थकीत कर्जदारांची माहिती ‘ए’ मध्ये भरण्यात आली आहे. आता नियमित परतफेड करणाऱ्या सभासदांची ‘बी’'' मधील माहिती ९ मार्च २०२६ पर्यंत अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. .Farmer Loan Waiver 2026 : २ लाखांपर्यंत शेतकरी कर्जमाफीची अर्थसंकल्पात घोषणा; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील अल्पमुदत पीक कर्जाची वसुली ३० जून २०२४ पर्यंत पूर्ण झालेल्या तसेच २०२३-२४ मधील कर्जाची वसुली ३० जून २०२५ अखेर झालेल्या सभासदांची माहिती नोंदविणे आवश्यक आहे. २०२४-२५ मधील कर्जापैकी आजअखेर वसुली झालेल्या शेतकऱ्यांचाच समावेश केला जाणार आहे..जिल्हा बँकेने बिकास सेबा सोसायट्यांकडून तातडीने माहिती मागवली आहे. वेळेत माहिती न भरल्यास संबंधित संस्था, सचिव व बँक फील्ड अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल.- शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जिल्हा बँक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.