Market Bulletin: सोयाबीनमध्ये सुधारणा आखातामध्ये युध्दाचा भडका उडाल्याने कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाली आहे तसेच पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे मुख्य खाद्यतेल उत्पादक देशांमध्ये जैवइंधानाचे उत्पादन वाढत आहे. यामुळे सोयाबीनसह इतर तेलबियांच्या भावालाही आधार मिळत आहे. देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात मागील चार दिवसांमध्ये सुधारणा दिसून आली आहे. आज सोयाबीनचा भाव ५ हजारांच्या पुढे सरकला आहे. सोयाबीन आज प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान विकले गेले. खाद्यतेलाचे भाव सुधारल्यास सोयाबीनच्या भावालाही आधार मिळेल, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस भाव दबावातचदेशातील बाजारात कापसाचा भाव मागील काही दिवसांपासून दबावातच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढल्याने पाॅलिस्टरचेही भाव वाढत आहेत. मात्र युध्दामुळे कापड निर्यातीवरही परिणाम होत आहे. यामुळे याचा कापूस भावाला लगेच फायदा होताना दिसत नाही. तसेच युध्द थांबल्यानंतर तेलाचे भाव पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस भाव देशात दबावातच आहेत. सध्या कापूस बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. बाजारातील कापसाची आवक कमीच आहे. तरीही मंदावलेला उठाव आणि सीसीआयची कापूस विक्री याचा बाजारावरील दबाव कायम राहील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: सोयाबीन आज स्थिर, कापूस भाव कमीच, हरभरा दबावात, वांग्याला उठाव, कारले टिकून.खरबुजाची आवक सुधारलीराज्यातील अनेक बाजारांमध्ये खरबुजाची आवक सुधारली आहे. तर खरबुजाला रमजानमुळे चांगली मागणी आहे. राज्यात यंदा खरबुजाची लागवड अनेक भागात सरासरीपेक्षा कमीच असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे बाजारातील आवक सध्या कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. सध्या बाजारात खरबुजाला गुणवत्तेनुसार सरासरी १५०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. उन्हाचा चटका वाढल्यानंतर खरबुजाला मागणी वाढणार आहे. त्यामुळे दरपातळी स्थिर राहू शकते, असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत. .Agrowon Podcast: कापसाचा भाव स्थिरावला; सोयाबीन स्थिरावले, मिरची तेजीत, ज्वारीचा भाव टिकून तर गवारचे भाव तेजीत.कोथिंबीरला उठावकोथिंबीरची बाजारातील आवक स्थिर आहे. तर कोथिंबीरची मागणी वाढलेली आहे. सण समारंभाचा आधार भावाला मिळत आहे. अनेक भागातील कोथिंबीरची काढणी सध्या कमी होत आहे. त्यामुळे अनेक मोठ्या बाजारांमधील आवक सरासरीपेक्षा कमी झालेली आहे. सध्या कोथिंबीर बाजारात प्रतिक्विंटल सरासरी १८०० ते २ हजाराने विकाली जात आहे. शेकडा ८०० ते १२०० रुपये भाव मिळत आहे. वाढत्या उष्णतेचा पिकावर परिणाम होऊन कोथिंबीरची बाजारातील आवक पुढील काही दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे. याचा आधार दराला मिळू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत. .मक्याला संथ उठावदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून मका भावावरील दबाव कायम आहे. मक्याचा उठाव कमी झालेला आहे. तर देशातील उत्पादन वाढलेले आहे. याचा परिणाम मक्याच्या भावावर दिसून येत आहे. मक्याला सध्या बाजारात सरासरी प्रतिक्विंटल १६०० ते १९०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याचे उत्पादन रब्बी हंगामातही चांगले राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरवठा चांगला राहून बाजारभावावरील दबावही कायम राहू शकतो, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.