Solapur News: २०२४-२५ या आर्थिक वर्षांत जिल्हा परिषदेच्या बांधकाम क्रमांक १ व २ च्या ५३२ कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत २८० कामे पूर्ण झाली असून उर्वरित २५२ कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले..जिल्हा परिषदेच्या २०४-२५ वर्षातील बांधकाम विभागाकडील कामांचा सीईओ कुलदीप जंगम यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते. बांधकाम विभाग क्रमांक एककडे ३०५४ ची २१५ कामे मंजूर करण्यात आली आहेत..Rural Development: शाश्वत ग्रामविकासाच्या आराखड्याची गरज.त्यापैकी ११९ कामे पूर्ण तर ९६ कामे सुरू आहेत. बांधकाम विभाग क्रमांक २ कडे २६० कामे मंजूर असून त्यापैकी १३१ कामे पूर्ण झाली असून १२९ कामे प्रगतिपथावर असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. ५०५४ खालील ५७ कामे असून यापैकी ३० कामे पूर्ण झाली असून २७ कामे सुरू आहेत..Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत.यामध्ये बांधकाम विभाग एककडील ३० पैकी १५ कामे पूर्ण तर १५ कामे अपूर्ण आहेत. बांधकाम विभाग २ कडील २७ पैकी १५ कामे पूर्ण तर १२ कामे अपूर्ण असल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगितले..कामांचा दर्जा ठेवा, मुदतीत कामे पूर्ण करा२०२४-२५ मध्ये बांधकाम विभागाकडील मंजूर करण्यात आलेली कामांचा दर्जा योग्य असावा. निविदेतील अटी व नियमांचे पालन करावे, जी कामे मुदतीत पूर्ण होणार नाहीत, त्या ठेकेदारांना नोटीस द्यावी, जे ठेकेदार दर्जाहीन कामे करतील त्याची चौकशा करून कारवाई करावी. मार्च २०२६ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना सीईओ जंगम यांनी दिल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.