ZP Election : जिल्हा परिषदेत सदस्य संख्येचे ‘काउंटडाउन’

Amaravati ZP : राज्यातील विधानसभा निवडणूक आटोपताच सर्वांना महापालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेध लागले आहे.
Election
ElectionAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : ग्रामीण भागातील राजकारणाचा पाया असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून, जिल्हा परिषद सर्कलनिहाय रचनेची माहिती निवडणूक विभागाला पाठविण्यात आली आहे.

येत्या एक किंवा दोन दिवसांत जिल्हा परिषदेच्या गटांची (सर्कल) म्हणजे सदस्यांची संख्या निश्चित होणार असून या वेळी जिल्हापरिषदेचे ५९ सदस्य राहणार, की त्यामध्ये वाढ होऊन ही सदस्यसंख्या ६९ होणार याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणूक आटोपताच सर्वांना महापालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वेध लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणुका घेण्याबाबतचे आदेश मिळाल्याने राज्य शासन आणि निवडणूक विभाग सक्रिय झाला. मागील तीन ते चार वर्षांपासून जिल्हा परिषदांची निवडणूक न झाल्याने अनेक ठिकाणी ग्रामीण भाग शहरी हद्दीत तर शहराचा काही भाग ग्रामीण हद्दीत समाविष्ट झालेला आहे.

Election
Chhatrapati Sugar Factory Election: ‘छत्रपती’वर पवार-जाचक यांच्या पॅनेलची सत्ता

तसेच अनेक ठिकाणी नवीन ग्रामपंचायती निर्माण झालेल्या आहेत. बदलत्या भौगोलिक परिस्थिनुसार जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या निर्धारित करण्यासाठी शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याची व तालुकानिहाय लोकसंख्या व भौगोलिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

त्यानुसार आता निवडणूक आयोगाकडून येत्या एक किंवा दोन दिवसांत जिल्हापरिषदेची नवी सदस्यसंख्या किती असणार या वरून पडदा उठणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या, तालुक्याचे नाव, एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची लोकसंख्या, अनु.जमातीची लोकसंख्या आदी माहिती मागविण्यात आली होती.

Election
Sugar Factory Election : तनपुरे साखर कारखान्याची सत्ता कोणाकडे जाणार

उत्सुकता शिगेला

तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५९ होती त्यानंतर ती ६९ करण्यात आली होती, मात्र त्यानंतर बरेच पाणी वाहून गेले. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने सदस्यसंख्या निर्धारित केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुक तसेच माजी सदस्यांचे हार्टबीट वाढले आहे.

अनेकांनी तर संभाव्य आरक्षण लक्षात घेवून तयारी सुद्धा चालविली आहे तर आरक्षणाच्या निकषात न बसणाऱ्यांनी आता पंचायत समितीची तयारी सुरू केली आहे. एकूणच येत्या दोन ते तीन दिवसांत चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर खऱ्या अर्थाने ग्रामीण राजकारणाला गती मिळू शकणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com