Agriculture Business meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Agro Business: तरुणांनी कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे

Agriculture Business : कृषी क्षेत्रामध्ये कृषी पूरक व्यवसाय व कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये अमाप संधी उपलब्ध आहेत. या संधीचा फायदा शेतकरी बांधव आणि कृषी क्षेत्रातील युवा विद्यार्थ्यांनी घ्यावा.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : कृषी क्षेत्रामध्ये कृषी पूरक व्यवसाय व कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये अमाप संधी उपलब्ध आहेत. या संधीचा फायदा शेतकरी बांधव आणि कृषी क्षेत्रातील युवा विद्यार्थ्यांनी घ्यावा. यासाठी विविध प्रकल्प उभारणे त्या संदर्भातले प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठ आणि कृषी विभाग सहकार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर यांच्याद्वारे आयोजित रब्बी शेतकरी मेळावा आणि १०३ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. देशमुख बोलत होते.

या कार्यक्रमासाठी ईफको जिल्हा व्यवस्थापक कलीम शेख, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. किशोर झाडे, कृषी महाविद्यालय, कांचनवाडीच्या सहाय्यक प्राध्यापक श्रीमती. प्रणिता मुळे, डॉ. आनंद मडके, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ डॉ. अनिता जिंतुरकर, डॉ. संजूला भावर, डॉ. बस्वराज पिसुरे तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी दादासाहेब शिंदे, पांडुरंग ईनामे, सुभाष डापके यांच्यासोबत विद्यार्थी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री देशमुख म्हणाले, की पीएमएफएमई या योजनेअंतर्गंत छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा देशात पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये ३५ ते ४० टक्के अनुदान हे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत देण्यात येते. कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट स्थापना करून विविध कृषी पूरक उद्योगाकडे वळणे गरजेचे आहे.

डॉ. झाडे म्हणाले, की रब्बी ज्वारीची लागवड करत असताना कोरडवाहूसाठी परभणी सुपर मोती, परभणी मोती या वाणांचा तर सिंचन व्यवस्था उपलब्ध असल्यास परभणी ज्योती या वाणाचा अवलंब करावा. यावेळी श्री. इनामे, श्री. शिंदे यांनी देखील शेतीतील त्यांचे अनुभव व सुधारित शेती पद्धती याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बस्वराज पिसुरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.अनंत मडके यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Farmers: सोयाबीन उत्पादकांसाठी भावांतर योजना राबवा 

Banana Price Crash: निर्यातक्षम केळीस १५ ते २० रुपये दर

MSP Procurement: हमीभावाने १५ पासून खरेदी

Space Farming: चंद्रावरही शेती शक्य होणार; नॅनोतंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचे प्रयोग सुरु

Tractor Emission Norms: ‘ट्रेम ५’ मुळे ट्रॅक्टर होतील अधिक पर्यावरणपूरक

SCROLL FOR NEXT