Agri Business Management : ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू

SIILC : सकाळ माध्यम समूह व एकमेव कृषी दैनिक ॲग्रोवन संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी तर्फे "ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट" हा अभ्यासक्रम गेल्या १० वर्षांपासून चालविला जात आहे.
Agri Business Management
Agri Business ManagementAgrowon

Pune News : कृषी संलग्न उद्योग (स्टार्टअप) सुरू करण्यासह उद्योगांत चांगली नोकरी मिळण्यासाठी उपयुक्त ठरणारा आणि इंडस्ट्री तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ या १ वर्ष कालावधीच्या पदवीव्यूत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे. कोणत्याही शाखेची पदवी (ग्रॅज्युएशन) पूर्ण केलेला विद्यार्थी यासाठी पात्र असून त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

सकाळ माध्यम समूह व एकमेव कृषी दैनिक ॲग्रोवन संलग्न कौशल्य प्रशिक्षण संस्था एसआयआयएलसी तर्फे "ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट" हा अभ्यासक्रम गेल्या १० वर्षांपासून चालविला जात आहे. यंदा या अभ्यासक्रमाच्या पुढील बॅचसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधी तर उपलब्ध होतातच शिवाय उद्योजक होण्याचा आत्मविश्वासही मिळतो.

Agri Business Management
Agri Tourism Business : कृषी पर्यटन व्यवसाय घेतोय कोरोनानंतर उभारी

हा अभ्यासक्रम ३० टक्के क्लासरूम व ७० टक्के प्रात्यक्षिक अनुभवावर आधारित आहे. विद्यार्थ्यांना सहा महिने कृषी संलग्न जसे अन्नप्रक्रिया,कृषी निर्यात, सप्लाय चेन मॅनेजमेंट, हायड्रोपोनिक, टिश्युकल्चर इ. उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी दिली जाते. ज्यातून त्यांना स्वतःला कुशल बनविण्यास मदत होते. अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संभाषण,आयटी तंत्रज्ञान इ.कौशल्ये शिकविण्यावरही भर दिला जातो.

Agri Business Management
Agri Business Management : कृषी क्षेत्रात करिअरला उत्तम पर्याय ‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’

अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बीएस्सी ऍग्री, बीबीए, एबीएम, बीकॉम, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान इ. शाखांचे पदवीधारक प्राधान्याने अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाचणी परीक्षा, शैक्षणिक गुण, मुलाखतीद्वारे केली जाते. अभ्यासक्रमाविषयी अधिक माहितीसाठी खालील स्कॅनर स्कॅन करावा. संपर्क ः ९८८१०९९७५७, संकेतस्थळ: www.siilc.edu.in/abm

अभ्यासक्रमाचे प्रमुख विषय

- ॲग्री स्टार्टअप व उद्योजकता

- डेटा ॲनॅलिटिक्स

- आर्टिफिशिअल इन्टिलिजन्स इन ॲग्रिटेक

- मार्केट इंटलिजन्स

- सप्लाय चेन मॅनेजमेंट

- फूड प्रोसेसिंग इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी

- कृषी निर्यात व्यवस्थापन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com