Rahibai Popare Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Toxic Free Farming : तरुणांनी विषमुक्त शेतीची कास धरावी : राहिबाई पोपरे

Rahibai Popare : आजच्या तरुणांनी सेंद्रिय शेतीची कास धरत विषमुक्त शेती करणे ही काळाची गरज आहे. त्यातूनच एक निरोगी समाज निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन पद्मश्री राहिबाई पोपरे यांनी केले.

Team Agrowon

Nifad News : आजच्या तरुणांनी सेंद्रिय शेतीची कास धरत विषमुक्त शेती करणे ही काळाची गरज आहे. त्यातूनच एक निरोगी समाज निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन पद्मश्री राहिबाई पोपरे यांनी केले.

लासलगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ५४ व्या वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी राहिबाई बोलत होत्या. या वेळी संजय होळकर, गोविंदराव होळकर, किसनसिंह भल्ला,

हसमुखभाई पटेल, प्रकाश पाटील, चंद्रशेखर भावसार, योगेश पाटील, संदीप होळकर, कैलास साबळे, कवी प्रकाश होळकर, प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे, उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे, प्रा. भूषण हिरे आदी उपस्थित होते.

रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांची सखोल माहिती देऊन गावठी वाणांचे जतन व संवर्धन करण्याचे आवाहान राहिबाई यांनी केले. सेंद्रिय शेतीतून कशाप्रकारे माणसाचे आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते, हे त्यांनी विविध उदाहरणांतून सांगितले.

आजचा तरुण मोबाइलमध्ये गुंतून गेला आहे. त्यामुळे माणसामाणसांतील संवाद व संवेदना नष्ट होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शैक्षणिक, कला, क्रीडा विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा पुरस्कार देऊन गुणगौरव झाला. प्राचार्य डॉ. मोरे यांनी अहवाल वाचन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT