Organic Farming : विषमुक्त सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्या

Residue Free Agriculture : अन्नधान्याच्या आणि संकरित वाणांच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो.
Organic Farming
Organic Farming Agrowon

Pune News : ‘‘अन्नधान्याच्या आणि संकरित वाणांच्या तसेच इतर पिकांच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो.

त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडून जमिनीतील जैविक घटकांचा विनाश झाल्याने जमिनी मृतवत होत चालल्या आहेत. हा प्रकार रोखण्यासाठी पर्याय म्हणून विषमुक्त सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे.

यासंदर्भात सेंद्रिय शेतीसाठी कृषी खात्यामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा,’’ असे आवाहन आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप यांनी केले. पोखरी (ता.आंबेगाव) येथे डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत सेंद्रिय गटांचा गावस्तरावर झालेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात घोलप बोलत होते.

Organic Farming
Organic Farming : पुणे जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला सुरुवात

या वेळी मंडल कृषी अधिकारी रामचंद्र बारवे, सरपंच हनुमंत बेंढारी, कृषी पर्यवेक्षक श्री. डामसे, प्रकाश आंबेकर, कृषी साहाय्यक आर. के. विरणक, अरविंद मोहरे, ज्ञानेश्वर लोहकरे उपस्थित होते.

Organic Farming
Organic Farming : सातपुड्यातील शेतकरी पुत्र देत आहेत सेंद्रीय शेतीचा संदेश

तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ म्हणाले, ‘‘सद्यःस्थितीत उत्पादित होणाऱ्या अन्नधान्यावर रासायनिक खतांचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे मानव व पशुपक्षी यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. ही बाब चिंताजनक आहे.’’

नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे मृदाविषय तज्ज्ञ योगेश यादव यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. आत्मा समन्वयक धोंडिभाऊ पाबळे यांनी प्रास्ताविक व प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब बेंढारी यांनी आभार केले.

रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी कडक होत आहेत. त्यामुळे मशागतीच्या खर्चात वाढ होत आहे. रासायनिक निविष्ठांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी, उत्पादन खर्च वाढून शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.
योगेश यादव, मृदाविषय तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव
आंबेगाव तालुक्यात परंपरागत कृषी विकास १५ शेतकरी गट व डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत दहा गट आहेत. नैसर्गिक शेतीचा ५०० हेक्टरचा क्लस्टर व परंपरागत कृषीविकास योजनेअंतर्गत ३०० हेक्टरचा क्लस्टर तयार केला आहे. ८२९ शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत. ते नाचणी, हिरडा, भात ही पिके उत्पादित करणार आहेत. त्यांची शेतकरी कंपनी स्थापन करून वर्गवारी, प्रतवारी, पॅकिंग व बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- नरेंद्र वेताळ, कृषी अधिकारी, ता. आंबेगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com