Organic Farming : सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे

MP Jaysiddheshwar Shivacharya Shivacharya Mahaswami : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे,’’ असे मत खासदार डॅा. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी नुकतेच केले.
Organic Farming
Organic FarmingAgrowon
Published on
Updated on

Solapur News : ‘‘रासायनिक खताच्या अवास्तव वापराचे दुष्परिणाम आपण पाहतो आहोत. त्यावर सेंद्रिय शेतीचा पर्याय आहे. केंद्र सरकारकडून त्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. विविध योजना त्यासाठी आखल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे,’’ असे मत खासदार डॅा. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांनी नुकतेच केले.

कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, सोलापूरतर्फे आयोजित कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्‍घाटन डॉ. महास्वामी यांच्या हस्ते झाले. शबरी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘आत्मा’चे राज्य संचालक दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने,

Organic Farming
Organic Farming : विषमुक्त सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्या

केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. ला. रा. तांबडे, नैसर्गिक शेतीचे अभ्यासक वासुदेव गायकवाड, गो-आधारित सेंद्रिय शेतीचे प्रणेते जगन्नाथ मगर, ‘आत्मा’चे उपसंचालक आर. एस. माळी आदी उपस्थित होते.

डॉ. महास्वामी म्हणाले, ‘‘‘मी ज्या ज्या वेळी केव्हीके’मध्ये येतो, तेव्हा काहीतरी नवीन शिकायला मिळते. तसेच ऐकलेले तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळते. आजही मला शेतीची बरीचशी माहिती आणि उपक्रम इथे पाहायला मिळाले. केव्हीकेचा शेतकऱ्यांना तंत्रज्ञान समजावून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष दाखविण्याचा हा उपक्रम स्तुत्य असा आहे.’’

Organic Farming
Organic Farming : पुणे जिल्ह्यात सेंद्रिय शेतीला सुरुवात

गायकवाड म्हणाले, की गावरान बियाण्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडे आपल्या वाडवडिलांकडून परंपरेने आलेले काही पिकांचे वाण असतील, तर ते जपणे गरजेचे आहे.’’

सेंद्रिय शेतीवर तांत्रिक चर्चासत्रे

नैसर्गिक शेतीचे अभ्यासक वासुदेव गायकवाड म्हणाले, ‘‘रासायनिक शेती अनेक वर्षे केल्यानंतर त्यामध्ये अनेक गोष्टींवर विपरीत परिणाम झाला. आता नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती करताना लगेच दोन-तीन वर्षांत भरपूर उत्पादनाची लगेच अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. उत्पादन खर्च प्रचंड कमी येतो व त्यामुळे उत्पादकता कमी झाली तरीही शेती परवडते. मी केवळ १० ते २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून वार्षिक एकरी एक ते दीड लाख रुपये इतके उत्पन्न मिळवतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com