Power Cuts Disrupt Farming: सततच्या वीज खंडिततेमुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून दुग्ध व्यवसायासह शेतीवरही परिणाम होत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या निषेधार्थ सिद्ध पिंपरी (ता. जि. नाशिक) येथे ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी सोमवारी (ता. २१) महावितरणविरोधात धडक मोर्चा काढला..महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शेतकऱ्यांच्या सहभागाने निघालेला हा मोर्चा महावितरणच्या उपअभियंता कार्यालयावर धडकला. यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. पिंपळनेर यांना निवेदन देऊन तातडीने भारनियमन थांबविण्याची मागणी करण्यात आली..Rural Load Shedding: लोडशेडिंगविरोधात चांदवडमध्ये टेंभा आंदोलन.संध्याकाळी ७ ते रात्री ११ या अभ्यासाच्या आणि दैनंदिन कामकाजाच्या महत्त्वाच्या वेळेत वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. चुकीचे नियोजन आणि मागणी-पुरवठ्यातील तफावतीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला..Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा.आंदोलनात नूतन माध्यमिक विद्यालयाचे सुमारे ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘‘लोडशेडिंग थांबवा, आमचे भविष्य वाचवा’’, ‘‘परीक्षा तोंडावर, वीज गायब’’, ‘‘वीज बिल वेळेवर घेता, मग वीज का देत नाही?’’अशा आशयाचे फलक विद्यार्थ्यांनी झळकावत तीव्र निषेध व्यक्त केला..या आंदोलनात शेतकरी संघटनेचे रामनाथ ढिकले, भानुदास ढिकले, शंकरराव ढिकले, जयराम ढिकले, माजी सभापती अनिल ढेकले, चेअरमन अंबादास ढिकले, शिवसेनेचे सुरेश ढिकले, नामदेव ढिकले, मनोज जाधव, पंडितराव जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.