Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Jaltara Project : जलतारा करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

Water Conservation : या वर्षी अकोला जिल्ह्यातील अनेक भागांत सरासरीपेक्षा अनियमित पर्जन्यमान झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Akola News : गेल्या काही वर्षांत जमिनीतील भूजल पातळी कमालीची घटली आहे. पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी जलतारा प्रकल्प करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव येथील युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त ज्ञानेश्‍वर ढोरे यांनी केले आहे. जलतारा प्रयोगाच्या अनुषंगाने त्यांनी याचे महत्त्व मांडले.

या वर्षी अकोला जिल्ह्यातील अनेक भागांत सरासरीपेक्षा अनियमित पर्जन्यमान झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ज्या भागात फक्त पावसावर शेती केली जाते त्या भागात शेतकऱ्यांना भूजल पातळी वाढवणे महत्त्वाचे झालेले आहे.

एप्रिल महिन्यात विहिरींनी तळ गाठला असून बोअरवेलची पाणी पातळी घटल्यामुळे तेही बंद पडले. आता यावर उपाययोजना म्हणून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामूहिकपणे पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी आपल्या शेतामध्ये जलतारा प्रकल्प राबवावेत असे ढोरे यांनी म्हटले आहे.

जलतारा प्रकल्प करण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून मनरेगातून प्रत्येक जॉब कार्डधारकाला एक जलतारा प्रकल्प करण्यासाठी पाच हजार रुपये अनुदानाचीही तरतूद आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रानुसार जलतारा (शोषखड्डे) करावेत. एक एकरासाठी एक जलतारा नक्की करावा.

आपल्या जमिनीचा उतार व पाणी कुठे साचते त्यानुसार जलतारा करावेत. मनरेगातून कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एका जॉब कार्ड वर एक जलतारा प्रकल्प देण्यात येत आहे. श्री. ढोरे हे महागाव येथील रहिवाशी असून या अनुषंगाने गावात १०० वर जलतारा करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही ढोरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Assembly Monsoon Session: सौर पंपांऐवजी वीज पंप देण्याबाबत धोरण आणू: ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

Ethanol Blending: जूनमध्ये इथेनॉल मिश्रण पोचले १९.९ टक्क्यांपर्यंत

BT Cotton Productivity: बीटी कापसाच्या उत्पादकतेवर प्रश्‍नचिन्ह

Soybean Stock: सोयाबीनचा शिल्लक साठा २३ टक्के कमी राहणार

Maharashtra Rain: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT