Jaltara Yojana : ‘जलतारा’ योजना ही लोकचळवळ व्हावी

Water Conservation : जिल्ह्यात जलस्रोतांचे प्रमाण पार कमी आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता नवीन नदी, तलाव निर्माण होणे शक्य नसल्याने उपलब्ध परिस्थितीवर मात करून पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे आहे.
Jaltara Yojana
Jaltara YojanaAgrowon
Published on
Updated on

Washim News : जिल्ह्यात जलस्रोतांचे प्रमाण पार कमी आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता नवीन नदी, तलाव निर्माण होणे शक्य नसल्याने उपलब्ध परिस्थितीवर मात करून पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे आहे. शासनाने ‘जलतारा’ योजना सुरू केली असून, वाशीम जिल्ह्यामध्ये १० लाखांपेक्षा जास्त शोषखड्डे शेतामध्ये जलतारा योजनेअंतर्गत निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

यापेक्षाही अधिक खड्ड्याचे निर्माण व्हावे याकरिता जलतारा ही योजना लोकचळवळ होणे जरुरी असून, यामध्ये शेतकरी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था, प्रबोधनकार व प्रत्येकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस. यांनी केले आहे.

Jaltara Yojana
Jaltara Project : कोंढाळा झामरे गावात होणार एक हजार ‘जलतारा’

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची या प्रकल्पासंदर्भात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. अप्पर जिल्हाधिकारी विश्‍वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प समन्वयक कैलास देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. हरीश बाहेती, उद्योजक देवेंद्र खडसे पाटील, गिरिधारीलाल सारडा,

बीजेएस व तरुण क्रांती मंचचे नीलेश सोमाणी, समाजसेवक अविनाश मारशेटवार, विजय चव्हाण, प्रवीण पटेल, बाळासाहेब मेहकरकर, शेख मोबीन, दीप पटेल, राधेश्याम मालपाणी, संगीता इंगोले, दीपा वानखेडे, वृषाली टेकाळे, अ‍ॅड. सुरेश टेकाळे, परवेजभाई, श्याम सवाई, पवनकुमार मिश्रा, नारायण सोळंके, अर्चना मेहकरकर, ज्ञानेश्‍वरी सोळंके, डॉ. मोनिका भागडे, डॉ. प्रकाश भागडे, डॉ. सुखविंदर ओबेरॉय, सौरभ जैन, सुदर्शन सरनाईक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी श्री. देवरे यांनी योजनेचे महत्त्व पटवून दिले. योजनेमुळे शेतकरी व ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी संपुष्टात येऊन आर्थिक उत्पनामध्ये सुद्धा भरभराट होणार आहे. साधारणतः एक जलतारा एका पावसाळ्यात ३.६० लाख लिटर पाणी जमिनी मुरवू शकतो.

Jaltara Yojana
Jaltara Project : ‘जलतारा’ची १७ कामे शिराळा तालुक्यात पूर्ण

त्यामुळे जर जिल्ह्यामध्ये १० लाख जलतारा शोषखड्डे निर्माण झाल्यास एकबुर्जीसारख्या ३० धरणांएवढी क्षमता वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ. बाहेती यांनी वाशीम जिल्ह्यात ११ लाख १११ जलतारा निर्माण करण्याचा संकल्प केला. वाशीम जिल्ह्यामध्ये ग्राम लाडेगाव जलताराचे रोल मॉडेल होत आहे.

जिल्हाधिकारी दररोज करणार श्रमदान

‘जलतारा’ योजना ही लोक चळवळ व्हावी याकरिता जिल्हा प्रशासन पूर्णपणे कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी दररोज सकाळी ७ ते १० ग्रामस्थांसोबत श्रमदान करणार आहेत. ग्रामस्थांनी नियोजन केल्यास जिल्हाधिकारी प्रत्येक ठिकाणी या कार्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. या ‘स्कोच ऑर्डर आप’ मेरिट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्याने त्यांचा सामाजिक संघटनांच्या वतीने सत्कारही करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com