Soybean Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Soybean Disease : बार्शी तालुक्यातील उपळे, पानगाव मंडलातील मळेगाव, ढाळे पिंपळगाव, महागाव, साकत, जामगाव, हिंगणी येथे २ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला.

Team Agrowon

Solapur News : बार्शी तालुक्यातील उपळे, पानगाव मंडलातील मळेगाव, ढाळे पिंपळगाव, महागाव, साकत, जामगाव, हिंगणी येथे २ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला. उपळे दुमाला मंडलात ६२.२ मिलिमीटर तर पानगाव मंडलात ५६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मळेगाव परिसरात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिले. सोयाबीन कापणीसाठी महिन्याचा अवधी असताना पिके येलो मोझॅकच्या संकटात सापडली आहेत. उपळे व पानगाव मंडलातील विविध गावांत मुसळधार पाऊस होऊनही शासकीय पर्जन्यमापक नोंदीच्या आकडेवारीत शेतकरी अडकला आहे.

शासकीय नियम, झालेला पाऊस, येलो मोझॅकचा प्रादुर्भाव, महागाईमुळे सोयाबीन उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. दिवाळीचा सण व रब्बी हंगाम पेरणी कशी करायची, हा प्रश्न बळिराजापुढे निर्माण झाला आहे. बार्शी तालुक्यातील हिंगणी, ढाळे पिंपळगाव, मध्यम प्रकल्प, छोटे- मोठे पाझर तलाव, ओढे, नाले तुडुंब भरलेले आहेत.

दोन सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीत पावसाचे पाणी सोयाबीन पिकात साचले. यामुळे येलो मोझॅकच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिवळी पडू लागली आहे. सरकारने व प्रशासनाने सरसकट नुकसान भरपाई मिळवून देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी.
- अशोक माळी, सोयाबीन उत्पादक शेतकरी, मळेगाव, ता. बार्शी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT