Team Agrowon
सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतोय. सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोगाचं संक्रमण फुलोरा अवस्थेत झाल्यास, ९० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.
या रोगाचा प्रादुर्भाव हा पांढऱ्या माशीमार्फत होतो. त्यामुळे मोझॅक रोगाचा प्रसार जर रोखायचा असेल तर पांढऱ्या माशीवर नियंत्रण मिळवण गरजेच आहे.
याशिवाय दाट पेरणी, नत्रयुक्त खताचा अतिवापर आणि रोग वाहक पांढरी माशी या घटकांमुळे या रोगाचं प्रमाण वाढत जातं.
रागाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानांचा काही भाग हिरवट, तर काही भाग पिवळसर दिसून येतो.
पानांमधील हरितद्रव्य कमी झाल्यामुळे अन्ननिर्मिती प्रकियेमध्ये बाधा निर्माण होते आणि उत्पादनात घट येते. शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात.
शेंगामध्ये दाणे कमी भरतात. अर्धी हिरवी पिवळी पाने असलेले प्रादुर्भाव झालेलं झाड लांबून देखील ओळखता येतं.
रोगाचं एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करताना कीड-रोगांना प्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणाऱ्या सोयाबीन वाणांची लागवड करावी.
कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे. प्रादुर्भावग्रस्त झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात पीक तणमुक्त ठेवावे. याशिवाय
Cotton Pest : कापसातील तुडतुड्यांचा प्रादुर्भाव असा ओळखा