Vidul Farmer Producer Company Agrowon
ॲग्रो विशेष

Betel Leaves Use : यवतमाळमध्ये खाऊच्या पानापासून तयार केले खास तांबुल

Tambul Production : तब्बल बारा वर्षांच्या संशोधनानंतर औषधी गुणधर्म असलेल्या तांबुलचे व्यावसायिक उत्पादन घेण्यात विडूळ फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या संचालकांना यश आले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : तब्बल बारा वर्षांच्या संशोधनानंतर औषधी गुणधर्म असलेल्या तांबुलचे व्यावसायिक उत्पादन घेण्यात विडूळ फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या संचालकांना यश आले आहे. या माध्यमातून या भागात उत्पादित खाऊच्या पानाला शाश्‍वत बाजारपेठ उपलब्ध होत त्याचे मूल्यवर्धनाला चालना मिळेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे.

माहूर येथील रेणुका देवी गडावर प्रसाद म्हणून खाऊचे पान तसेच सौफ, लवंग यांसारख्या घटकांचा वापर करीत तांबूल तयार करण्याची प्रथा आहे. त्याच तांबुलला व्यावसायिक स्वरूप देत त्या माध्यमातून खाऊच्या पानाला शाश्‍वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न विडूळ फार्मर प्रोड्यूसर कंपनीने केला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्मा प्रकल्प संचालक संतोष डाबेर, तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तत्कालीन उपविभागीय अधिकारी (महसूल) स्वप्नील कापडणीस, अन्न औषधी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय माने यांनी पाठबळ दिल्याने हे शक्‍य झाल्याचे संचालक रामेश्‍वर बिचेवार यांनी सांगितले. कंपनीचे संचालक रवी शंकर गांजरे, प्रमोद नागोबा दिल्लेवार, मारोती किसन कोत्तेवार, गजानन दिगांबर मुलंगे, उदय पांडुरंग देवसरकर, गजानन गांजरे यांचा समावेश आहे.

पानमळ्याचे हब विडूळ

उमरखेड तालुक्‍यातील विडूळ परिसरात ५०० पेक्षा अधिक पानमळे होते. २००१ मध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव झाला त्या वेळी केवळ १ पानमळा शिल्लक उरला. मात्र हे शाश्‍वत उत्पन्न देणारे पीक असल्याने गावातीलच काही शेतकऱ्यांनी या पिकासाठी इतरांना प्रोत्साहित केले. त्याच्या परिणामी पानमळ्यांची संख्या आज ६४ वर पोहोचली आहे.

...असे तयार होते तांबुल

खाऊचे पान (नागवेल), केसर या दोन घटकांचा समावेश यात मुख्यत्वे राहतो. त्यासोबतच जायफळ, सौफ, लवंग यांसह तब्बल १७ घटकांचा यात समावेश करण्यात आला आहे. हे तयार करताना आर्द्रता आठवर आणली जाते. दोन महिने ड्राय फर्मन्टेशन केले जाते. डीहायड्रेशनअंती तांबुल तयार होतो. त्यामुळे याचा टिकवण कालावधी वर्षभरापर्यंत वाढविता येतो. या साऱ्या प्रक्रियेअंती बाजारात विक्रीसाठी हे उपलब्ध करण्यात आले आहे. याचा उत्पादकता खर्च ३८०० रुपये प्रति किलो असा आहे.

२०१२ मध्ये तांबुल तयार करण्यासाठीचे काम हाती घेतले. याकरिता अनेक बाबींचा अभ्यास केला. त्यानंतर गुरुवारी (ता. ५) यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते याचे व्यावसायिक लॉचिंग करण्यात आले.
रामेश्‍वर बिच्चेवार, संचालक, विडूळ फार्मर प्रोड्यूसर कंपनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dragon Fruit Production: ड्रॅगन फ्रूटची प्रतिवर्ष चार हजार हेक्टर वाढ

Bedana Demand: बेदाण्याला मागणी, उठाव कमी

Climate Change: सरासरी पाऊसमान होऊनही उकाडा कायम

Monsoon Rain: पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज कायम

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

SCROLL FOR NEXT