Betel Leaf Production : अतिपावसाचा पानमळ्यांना फटका

Team Agrowon

अतिपाऊस झाल्यामुळे नागवेलीची मुळे कुजू लागली आहेत. पानमळ्यासाठी घातलेला खर्च वाया गेला आहे. त्यातच दर कमी असल्याने ताळमेळ कसा घालायचा, असा प्रश्न पडला आहे.

Betel Leaf Production | Agrowon

अतिपावसामुळे अंदाजे ३० टक्के क्षेत्रावरील पानमळ्यात मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पानमळे धोक्यात आले आहेत.

Betel Leaf Production | Agrowon

मिरज तालुक्यातील आरग, बेडग, नरवाड, लिंगनुर, खटाव, खंडेराजूरी आणि गुंडेवाडी या गावात पानमळे आहेत. या सात गावांत अंदाजे ३२५ एकरांवर पानमळे आहेत.

Betel Leaf Production | Agrowon

प्रतिकूल परिस्थिती शेतकरी पानमळ्याची शेती आजही करत आहेत. गेल्या चार वर्षांपूर्वी कोरोनामुळे पानमळे धोक्यात आले होते. त्यातूनही शेतकऱ्यांनी पानमळे जीवंत ठेवले.

Betel Leaf Production | Agrowon

अतिपावसाचा फटका पानमळ्यांना बसला. शेतात पाणी साचून राहिले. सलग पाऊस सुरू असल्याने शेतीतील पाणी कमी झाले नाही.

Betel Leaf Production | Agrowon

मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली. मुळ कूज झाल्याने वेल वाळून जातो. परिणामी पानमळे धोक्यात आले आहेत. अतिपावसामुळे सुमारे ३० टक्के क्षेत्रावर मूळकुज झाली असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Betel Leaf Production | Agrowon

सध्या श्रावण महिना सुरू आहे. पान विक्रीचा हंगाम सुरू आहे. श्रावण महिन्यात पानांना चांगले दर मिळतात. मात्र, यंदा श्रावणात पानांना अपेक्षित दर नसल्याने अगोदरच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Betel Leaf Production | Agrowon

Terda Flower : रानोमाळ बहरला रंगीबेरंगी तेरडा फुलांचा सुगंध

आणखी पाहा...