Market Update: देशभरात पावसामुळे बाजारपेठा ठप्प असल्याने बेदाणाची मागणी आणि उठाव काहीसा मंदावला आहे. अशा परिस्थितीतही बेदाण्याचे दर टिकून आहेत. दसरा, दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याचे दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.