Parbhani News: वनस्पतीवरील सूक्ष्मजीवांचे समूह (फाइटो-मायक्रोबायोम) जैविक शेती व पर्यावरणपूरक उत्पादनांसाठी उपयुक्त आहेत. या सूक्ष्मजीवांचा प्रभावीपणे वापर करता यावा यासाठी स्थानिक पातळीवर शिबिरे आयोजित करून शेतकऱ्यांना माहिती द्यावी, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभाग आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत ‘शाश्वत शेतीसाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांचे कार्य, महत्त्व आणि तंत्रज्ञान’ या विषयावरील दहादिवसीय लघू अभ्यासिकाचे उद्घाटन सोमवारी (ता. २७) कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये झाले.
या वेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते. डॉ. सीमा जग्गी आभासी माध्यमाद्वारे सहभागी होत्या. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एम. वाघमारे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ. विक्रम घोळवे, डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. संदीप बडगुजर आदी उपस्थित होते.
डॉ. इंद्र मणी म्हणाले, की वनस्पतीरोग शास्त्र विभागामार्फत उत्पादित केलेल्या बायोमिक्स या जैविक बुरशीनाशकामुळे विविध रोगांचे नियंत्रण होऊन पिकाचे उत्पादन वाढल्याचे तसेच याचा फायदा मराठवाड्यातील, तसेच इतर राज्यांतील लाखो शेतकऱ्यांना झाला.
दहा दिवसांच्या लघू अभ्यासिकेत संपूर्ण भारतातून २५ प्रशिक्षणार्थी शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगढ, जम्मू काश्मीर, कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतील शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.