Dr. Indra Mani : कडधान्य उत्पादकता, क्षेत्र वाढीसाठी विचार करणे गरजेचे

Agriculture Advice : कडधान्यांची उत्पादकता व क्षेत्रफळ वाढवण्याच्या दृष्टीने वाण निर्मितीमध्ये यांत्रिकीकरण, उशिरा येणारा पाऊस, बदलते हवामान या घटकांचा विचार करणे आवश्यक, असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी व्यक्त केले.
Dr. Indra Mani
Dr. Indra ManiAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : कृषी संशोधन केंद्र बदनापूर येथील कडधान्य संशोधनाला बळकट करण्याची गरज आहे. कडधान्यांची उत्पादकता व क्षेत्रफळ वाढवण्याच्या दृष्टीने वाण निर्मितीमध्ये यांत्रिकीकरण, उशिरा येणारा पाऊस, बदलते हवामान या घटकांचा विचार करणे आवश्यक, असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी व्यक्त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र बदनापूर आणि अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (खरीप कडधान्य) भारतीय कडधान्य संशोधन संस्था कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ जानेवारी २०२४ रोजी कडधान्याबाबत विचार मंथन कार्यशाळेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथील हिमायतबाग फळ संशोधन केंद्र येथे करण्‍यात आले होते.

Dr. Indra Mani
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणतात राज्यातील शेतकऱ्यांना ४४ हजार कोटी रुपयांची मदत

या ‘तूर व मूग, उडीद या पिकांच्या फेरसंरचना आणि उत्पादन श्रेणी’ विषयावरील कार्यशाळेचे उद्‍घाटक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा बोलत होते.

कार्यशाळेच्या उद्‍घाटन प्रसंगी भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्लीचे सहायक महा संचालक डॉ. संजीव गुप्ता, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पुरी, भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर आणि आदित्य प्रतापचे माजी संचालक डॉ. नटराजन, कृषी सचिव अनुप कुमार, प्रकल्प समन्वयक, खरीप कडधान्य आणि कडधान्यांमध्ये संशोधन करणारे शास्त्रज्ञ उपस्थित होते.

Dr. Indra Mani
Vatana Market : पुणे ‘मार्केट’मध्ये वाटाणा खातोय चांगलाच भाव

कृषी सचिव कुमार म्हणाले, की २०२७ पर्यंत भारताला कडधान्यांमध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने संशोधन संस्था आणि कृषी विभागाला मिळून काम करण्याची गरज आहे.

डॉ. गुप्ता म्हणाले, की कडधान्य पीक प्रात्यक्षिके अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच कडधान्याच्या बियाण्यांबाबत स्वयंपूर्ण आदर्श गाव निर्मिती करण्याबाबत प्रकल्प राबवण्यात येणार आहे. कडधान्य पिके फायदेशीर राहण्याच्या दृष्टीने कडधान्यांची उत्पादकता आणि त्यांच्या लागवडीतील सुलभता या बाबींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

तर पीक पद्धतीसाठी योग्य असे मुग आणि उडीद वाण निर्माण केल्यास या पिकांखालील क्षेत्र वाढू शकते, असे ते म्हणाले डॉ. सुरेखा कदम यांनी सूत्रसंचालन तर कृषी संशोधन केंद्र येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. के. पाटील यांनी आभार मानले. मंगळवारी (ता. ९) बदनापूर येथे तूर पिकाच्या एन. बी. पी. जी. आर नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रजातींचे प्रात्यक्षिकास भेट देण्यात आली.

पीक फेरसंरचना करण्याची गरज

तुर पिकामध्ये आंतरपिकासाठी सुयोग्य जाती निर्मितीच्या दृष्टीने पीक फेर संरचना करण्याची गरज कार्यशाळेतील पहिल्या सत्रामध्ये व्यक्त करण्यात आली. तसेच यांत्रिकीकरण, तूर पिकाच्या प्राथमिक अवस्थेत किंवा पीक काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाल्यानंतर पाणी साचल्यामुळे पिकाचे होणारे नुकसान लक्षात घेता.

याबाबत प्रतिकारक वाण निर्मिती करण्यासाठी पिकाचे कोणते घटक कारणीभूत ठरतात याबाबत संशोधन करून वान निर्मितीमध्ये त्यांचा समावेश करणे याबाबत विचार मंथन झाले. ठिबक सिंचन आणि तणनाशकासाठी प्रतिकारक वाण निर्मिती बाबत यापुढील काळात काम करण्याची गरज शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com