Maharashtra Winter Weather: महाराष्ट्रावर आज व उद्या (ता. ९, १०) हवेचे दाब १०१० ते १०१२ हेप्टापास्कल इतके राहतील. तर मंगळवार (ता.११) पासून महाराष्ट्राच्या मध्यावर १०१२ हेप्टापास्कल व दक्षिणेस १०१० हेप्टापास्कल इतके हवेचे दाब राहतील. त्यामुळे महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर थंडीस सुरवात होईल. तसेच उत्तरेकडील भागात किमान तापमानात घसरण सुरू होईल. सुरुवातीस रात्री, पहाटे व सकाळी हवामान थंड राहील. दुपारीही कमाल तापमानात घसरण सुरू होऊन दुपारीही हवामान थंड राहील. .महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून व ईशान्येकडून राहील. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा ऑक्टोबर महिन्यातील पावसाचा आढावा घेतला असता, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ व सोलापूर जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्यांच्या सरासरीपेक्षा ६१ ते ७४ टक्के कमी पाऊस झाला आहे..तर वर्धा, चंद्रपूर, बुलडाणा, हिंगोली, बीड, धाराशिव, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा २२ ते ५९ टक्के कमी पाऊस झाला आहे. मात्र नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर या जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्यांच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, परभणी या जिल्ह्यांत त्या त्या जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा २४ ते ४१ टक्के अधिक पाऊस झाला आहे. यावरून पावसाच्या वितरणात बराच फरक झाल्याचे दिसून येते..या पुढील काळात चांगल्या थंडीची अपेक्षा आहे. साधारणपणे १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या २ महिन्यांच्या काळात थंडीचे प्रमाण अधिक राहील. १५ जानेवारीनंतर थंडीचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात होईल. साधारणपणे ४ मार्च २०२६ पर्यंत थंडी टिकून राहणे शक्य आहे..Weather Update: थंडीची चाहूल, गारठा वाढतोय.कोकणसर्वच जिल्ह्यांत पावसात उघडीप राहून चांगला सूर्यप्रकाश राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ कि.मी. राहील. कमाल तापमान पालघर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. रायगड जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात ते २५ अंश सेल्सिअस राहील. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. कोकणातील सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ७७ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व पालघर जिल्ह्यांत ५४ ते ५७ टक्के, तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६१ ते ६६ टक्के राहील..उत्तर महाराष्ट्रसर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर नाशिक व धुळे जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस आणि नंदुरबार जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याची दिशा नाशिक जिल्ह्यात ईशान्येकडून, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक जिल्ह्यात ताशी ६ कि.मी., तर जळगाव जिल्ह्यात ताशी १० कि.मी. राहील. मात्र धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ११ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत पावसात उघडीप राहून चांगला सूर्यप्रकाश राहील. आकाश सर्वच जिल्ह्यात निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ८२ टक्के, तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ७५ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील..मराठवाडाया आठवड्यात पावसाची शक्यता नाही. पावसात उघडीप राहून चांगला सूर्यप्रकाश राहील. कमाल तापमान धाराशिव जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. लातूर, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. तर नांदेड व परभणी जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस आणि धाराशिव जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याची दिशा धाराशिव जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून, तर लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील..वाऱ्याचा ताशी वेग धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ताशी ५ कि.मी., तर नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ताशी ६ कि.मी. राहील. जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ८ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता बीड जिल्ह्यात ८१ टक्के राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता लातूर व बीड जिल्ह्यांत ६० टक्के, तर धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ५० ते ५५ टक्के राहील..Hawaman Andaj: राज्यात थंडी वाढायला सुरुवात; उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट.पश्चिम विदर्भसर्वच जिल्ह्यात पावसात उघडीप राहून चांगला सूर्यप्रकाश राहील. कमाल तापमान बुलडाणा जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अमरावती जिल्ह्यात ६ कि.मी., वाशीम जिल्ह्यात ताशी ८ कि.मी., तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ताशी १० कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५६ टक्के राहील..मध्य विदर्भसर्वच जिल्ह्यात पावसात उघडीप राहून चांगला सूर्यप्रकाश राहील. कमाल तापमान वर्धा जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याची दिशा नागपूर जिल्ह्यात पूर्वेकडून, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नागपूर जिल्ह्यात ताशी ५ कि.मी., वर्धा जिल्ह्यात ताशी ८ कि.मी. आणि यवतमाळ जिल्ह्यात ताशी १० कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील..पूर्व विदर्भया आठवड्यात पावसाची शक्यता नाही. पावसात उघडीप राहून चांगला सूर्यप्रकाश राहील. कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस आणि गडचिरोली जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात १२ अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याची दिशा गोंदिया जिल्ह्यात ईशान्येकडून, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत पूर्वेकडून राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २ ते ५ कि.मी. राहील. आकाश निरभ्र राहील. सर्वच जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ७८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५६ टक्के इतकी राहील..पश्चिम महाराष्ट्रया आठवड्यात पावसाची शक्यता नाही. पावसात उघडीप राहून चांगला सूर्यप्रकाश राहील. कमाल तापमान पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अहिल्यानगर जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस, तर पुणे जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून, तर सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांत ताशी ६ कि.मी., तर अहिल्यानगर जिल्ह्यात ताशी ८ कि.मी. राहील. आकाश निरभ्र राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहील..कृषी सल्लापूर्वहंगामी उसाची लागवड १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.गहू, हरभरा, मोहरी पिकाची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.पाण्याच्या ५ पाळ्या देणे शक्य आहे तेथेच गव्हाची पेरणी करावी.जेथे पाण्याच्या २ पाळ्या देणे शक्य असेल तेथे हरभरा व रब्बी ज्वारी, करडईची पेरणी करावी.कमाल आणि किमान तापमानात घसरण होणार असल्याने कुक्कुटपालन शेडमध्ये आणि गोठ्यात आवश्यक उपाययोजना कराव्यात.आंबा आणि काजू बागांमध्ये नवीन पालवी येत असल्यामुळे कीड प्रादुर्भावासाठी बागांची नियमित पाहणी करावी.(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.