warehouse  Agrowon
ॲग्रो विशेष

Warehouse Corporation : वखार आपल्या दारी’अंतर्गत बारा जिल्ह्यांत कार्यशाळा

 गोपाल हागे

Akola News : शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थांचे संचालक व शेतकऱ्यांसाठी ‘वखार आपल्या दारी ः महामंडळाचे वचन शेतमालाचे संरक्षण व साठवणुकीतून समृद्धीकडे या विषयावर अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व लातूर या विभागांतील १२ जिल्ह्यांत १३ ठिकाणी वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. या अभियानाची सुरवात आजपासून (ता.१८) अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूरमधून होत आहे.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळातर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यशाळांना उपस्थित राहावे, तसेच योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष दीपक तावरे यांनी केले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांनी पिकविलेला शेतमाल साठवणूक करून शेतकऱ्यांना शेतमाल तारण योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करणे, ब्लॉक चेन अंतर्गत शेतकऱ्यांना पत पुरवठा करणे, शेतकऱ्यांकडून उत्पादित शेतीमाल साठवणूक करण्यासाठी त्यांना आकर्षित करणे, महामंडळाकडून शेतकऱ्यांना शेतीमाल साठवणूक केल्यानंतर साठवणूक भाड्यामध्ये ५० टक्के सवलत देणे,

शेतकरी उत्पादक कंपनीला साठवणूक भाड्यात २५ टक्के सवलत देणे, खरीप व रब्बी हंगामातील सोयाबीन, मका, तूर, हरभरा, गहू, ज्वारी उत्पादकांनी कमी बाजारभावात शेतमालाची विक्री करू नये, यासाठी कार्यशाळेत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल.

‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या सहकार्य या साठी होत आहे. विविध कार्यकारी सहकारी संस्था व महिला बचत गटाचे फेडरेशनतर्फे गोदाम आधारित मूल्यसाखळी निर्मितीचे कामकाज करण्यात येत आहे.

कार्यशाळेचे नियोजन असे...

बुधवारी (ता. १८) मूर्तिजापूर (जि. अकोला), गुरुवार (ता. १९) वरूड (जि. अमरावती), शुक्रवार (ता. २०) काटोल (जि. नागपूर), शनिवार (ता.२१) आर्वी (जि. वर्धा), सोमवारी (ता. २३) वरोरा (जि. चंद्रपूर), बुधवार (ता. २५) वणी (जि. यवतमाळ), गुरुवार (ता. २६) वडसा (जि. गडच‍िरोली), १ नोव्हेंबर औसा (जि. लातूर), २ नोव्हेंबर अहमदपूर (जि. लातूर), ३ नोव्हेंबर लोहा (जि. नांदेड) , ४ नोव्हेंबर मानवत (जि. परभणी), ६ नोव्हेंबर माजलगाव, (जि. बीड) आणि ७ नोव्हेंबर वैजापूर, (जि. छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT