Pune News : ‘‘मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चांडोली खुर्द (ता. आंबेगाव) येथे उपबाजारात सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजार टन क्षमतेचे गोदाम उभारण्यात आले आहे.
लवकरच तेथे शेतीमाल साठविण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, गुरांचा आठवडे बाजारही सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे,’’ अशी माहिती बाजार समितीचे सभापती वसंतराव भालेराव यांनी दिली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे शरद पवार सभागृहात बाजार समितीच्या २० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भालेराव बोलत होते. त्या वेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, उपसभापती सचिन पानसरे, संचालक शिवाजीराव ढोबळे, रामचंद्र गावडे, संदीप थोरात, गणेश वायाळ, मयूरी भोर, रत्ना गाडे, जयसिंग थोरात, सखाराम गभाले, नीलेश थोरात, सोमनाथ काळे, संदीप चपटे, अरुण बांगर, राजेंद्र भंडारी, लक्ष्मण बाणखेले, सुनील खानदेशे यांच्यासह अनेक शेतकरी, अडते, व्यापारी उपस्थित होते.
भालेराव म्हणाले, ‘‘बाजार समितीमार्फत शेतकरी हिताचे अनेक निर्णय राबविण्यात आले आहेत. कांद्यासह शेतीमाल खरेदी-विक्री व्यवहार शेताकऱ्यांच्या समक्ष लिलाव पद्धतीने केले जातात. लोणी येथील उपबाजारात अडते व शेतकरी यांच्याशी चर्चा करून आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील.
तळेघर येथे आदिवासी भागातील शेतकऱ्यांशी चर्चा करून उपबाजार विकसित केली जाईल. मंचर येथे पूर्ववत भाजीबाजार सुरू केला जाईल. चांडोली खुर्द येथे अंतर्गत रस्ते, गटारे, स्वच्छतागृहे, वाहनतळ, माल चढविण्यासाठी प्लॅटफार्म याबाबतही कार्यवाही केली जाईल.’’
शेतकरी प्रशांत इंदोरे, नवनाथ इंदोरे, सरपंच दीपक पोखरकर, श्यामराव टाव्हरे, के. के. थोरात, बाबासाहेब खालकर, दत्ता थोरात, गणपतराव इंदोरे, कामगार नेते बाळासाहेब बाणखेले, राजेंद्र थोरात, प्रवीण मोरडे यांनी चर्चेत भाग घेतला. सचिव सचिन बोऱ्हाडे यांनी अहवाल वाचन व अरुण बांगर यांनी आभार मानले. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.