Millet Agrowon
ॲग्रो विशेष

Gift to PM Modi : पंतप्रधान मोदींना महिला देणार मिलेट पदार्थांची भेट

A gift of Millet Dishes : बोरामणी येथील यशस्विनी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्ष अनिता माळगे आणि अन्य शेतकरी महिला व कंपनीच्या सदस्या शुक्रवारी (ता. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेट पदार्थांची खास भेट देणार आहेत.

Team Agrowon

Solapur News : बोरामणी येथील यशस्विनी अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्ष अनिता माळगे आणि अन्य शेतकरी महिला व कंपनीच्या सदस्या शुक्रवारी (ता. १९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेट पदार्थांची खास भेट देणार आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी भरडधान्याचे (मिलेट) महत्त्व ओळखून त्या उत्पादनांना आणि प्रक्रिया पदार्थांना चालना व गती देण्याचे ठरवले आहे. सोलापूर जिल्हा भरडधान्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच राहणे महत्त्वाचे आहे.

पंतप्रधानांनी घोषणा केल्यास या संदर्भात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला विराम मिळणार आहे. भरडधान्य उत्पादनात जिल्ह्यातील शेतकरी व शेतकरी कंपनी यांचा सहभाग मोठा आहे. त्यामुळे या केंद्राची गरज सर्वार्थाने आहे.

त्याबद्दल सर्व शेतकरी व कंपनीतर्फे पंतप्रधान मोदी यांना निवेदन देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. श्री. मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त सोलापूरच्या भरडधान्यापासून केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची भेट देण्यात येणार आहे.

श्रीअन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच

अलीकडेच सोलापूरला मंजूर झालेले मिलेट केंद्र बारामतीला गेले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी कंपन्या, शेतकरी बचतगट आणि शेतकऱ्यांसाठी श्रीअन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच राहणे गरजेचे आहे. ते इथेच राहील, अशी घोषणा सोलापुरातील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी करतील, अशी अपेक्षा सर्व शेतकरी महिलांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT