Manoj Jarange Patil : संभ्रम निर्माण करू नका; आंदोलन होणारच

Maratha Reservation : समाज बांधवांनी तयार राहावे. सरकारकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यावर विश्वास ठेवू नका,’’ असे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सांगितले.
Manoj Jarange-Patil
Manoj Jarange-PatilAgrowon

Jalna News : ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे, याकरिता सात महिन्यांचा वेळ दिला. त्यात काही निर्णय झाला नाही. आरक्षण मिळाले नाही. उद्या (ता. २०) मुंबईला जायचे आहे. समाज बांधवांनी तयार राहावे. सरकारकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यावर विश्वास ठेवू नका,’’ असे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सांगितले.

जरांगे म्हणाले, ‘‘सरकारने मराठ्यांविरोधात ट्रॅप रचला आहे. आमच्यात फूट पाडण्यासाठी प्रयत्न होत आहे. सरकार आमच्याविरोधात खोटा बातम्या पसरवत आहेत. यात कोणते मंत्री, नेते, पालकमंत्री आहेत, यासाठी कोण विरोध करतेय हे मला माहिती आहे. उद्या सर्व मराठ्यांनी आंतरवाली सराटीमध्ये जमा व्हावे. आपल्याला मुंबईकडे रवाना व्हायचे आहे. यादिवशी कोणकोणते नेते येतात हे पाहायचे आहे. कोण नाही आले, त्यांना समाज पुढे बघेल.’’

Manoj Jarange-Patil
Maratha Reservation : यवतमाळ जिल्ह्यात कुणबी नोंदी पाच लाखांवर

‘‘शिष्टमंडळ येते नुसती चर्चा करते व निघून जाते. निर्णय होत नाही. शासनाला आता वेळ देणार नाही. मी मुंबईला येणारच आहे. मला गोळ्या घातल्या तरी चालतील. पण, माझा विचार मरू देऊ नका. मराठ्यांची एकजूट तुटू देऊ नका,’’ असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

Manoj Jarange-Patil
Manoj Jarange : आमचे आरक्षण लपवून का ठेवले ; मनोज जरांगे पाटील यांचा सवाल

जरांगे पाटील कडाडले...

आधी ५४ लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. त्याआधारे नातेवाईक, सगे-सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यावे

सरकार तोडगा निघाल्याच्या अफवा पसरवतेय, अद्याप तोडगा नाही.

आमच्यावर अंतरवाली सराटीसारखा प्रयोग कराल तर तुमचे राजकीय करिअर समाजाकडून उद्ध्वस्त होईल

उद्या अंतरवालीतून मुंबईकडे निघणार, सगळ्यांनी शांततेत चालावे, रस्त्यावर खान्या पिण्याची व्यवस्था करावी

मुंबईला यायचं नाही त्यांनी आम्हाला निरोप देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे यावे

या नवीन शिष्टमंडळाचा दोष नाही सरकारचा दोष

माझ्यावर ट्रॅप काय आहे हे रॅलीत गेल्यावर सांगणार

आमच्या नादी लागाल तर देशातील मराठे एक करून देशव्यापी आंदोलन उभारू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com