Agriculture Research : डॉ. उज्ज्वल राऊत यांना उत्कृष्ट संशोधनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार

PDKV Akola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फळशास्त्र विभागात कार्यरत सहयोगी प्राध्यापक व फळशास्त्रज्ञ डॉ. उज्ज्वल अजाबराव राऊत यांना फळपिकात केलेल्या संशोधन व विस्तार कार्यासाठी कृषी संशोधक म्हणून गौरविण्यात आले.
Dr. Ujjwal Raut
Dr. Ujjwal RautAgrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फळशास्त्र विभागात कार्यरत सहयोगी प्राध्यापक व फळशास्त्रज्ञ डॉ. उज्ज्वल अजाबराव राऊत यांना फळपिकात केलेल्या संशोधन व विस्तार कार्यासाठी कृषी संशोधक म्हणून गौरविण्यात आले.

उमरखेड येथील भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न कृषी विज्ञान मंचामार्फत हे सहकार महर्षी व लोकनेते भाऊसाहेब माने यांच्या स्मृतीदिनानिमित्त उमरखेड येथे कृषिक्षेत्रात उल्लेखनीय व विशेष कार्य करणाऱ्यांना गौरविण्यात आले.

Dr. Ujjwal Raut
Agriculture Research : डॉ. कुलकर्णी यांच्या शोधप्रबंधाची आंतरराष्ट्रीय जर्नलकडून दखल

या कार्यक्रमात फळपिकाच्या संशोधन व विस्तार कार्यासाठी डॉ. राऊत यांना त्यांनी विविध फळपिकात दिलेल्या अभिवृद्धीच्या संशोधनात्मक शिफारशी तसेच कोरडवाहू फळपिकाच्या माध्यमातून कवठाचा पीडीकेव्ही प्रताप हा वाण विकसित आहे.

Dr. Ujjwal Raut
Agriculture Research Center : कृषी संशोधन केंद्राचा पाणीपुरवठा १८ दिवस बंद

नावीन्यपूर्ण फळपिकाच्या माध्यमातून ड्रॅगनफ्रूट व खजूर या फळपिकाच्या संशोधनाच्या कार्याला चालना देण्यासाठी तसेच विविध फळपिकाच्या शास्त्रीय लागवडीबाबत व शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन व फळपिकांच्या कल्याणकारी योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याच्या दृष्टिने संशोधन व विस्तार कार्य केले. याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार गौरविण्यात आले.

या प्रसंगी अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक किसन मुळे, रेशीम संचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. एल. बी. कलंत्री तसेच माजी आमदार विजयराव खडसे, प्रकाश पाटील देवसरकर, उमरखेड कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. विजय माने व भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शेतीमित्र अशोकराव वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com