Millet Festival : पणन मंडळातर्फे पुण्यात १७ पासून ‘मिलेट महोत्सव’

Marketing Federation Millet Festival : राज्य कृषी पणन मंडळातर्फे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेअंतर्गत ‘मिलेट महोत्सव-२०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे.
Millet
MilletAgrowon

Pune News : ‘‘राज्य कृषी पणन मंडळातर्फे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ या संकल्पनेअंतर्गत ‘मिलेट महोत्सव-२०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. स्वारगेटजवळील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे १७ ते २१ जानेवारी दरम्यान हा महोत्सव होईल,’’ अशी माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.

कदम म्हणाले,‘‘संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून साजरे केले. या निमित्ताने देशभर विविध उपक्रम राबविण्यात आले. तृणधान्यांमधील पोषक तत्वांमुळे त्याकडे सामान्य ग्राहक आकर्षित होत आहेत.

Millet
Millet : ‘श्री अन्न उत्कृष्टता’वरून जिल्ह्यात संभ्रम कायम

यामुळे तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळावा, यासाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असा ‘मिलेट (तृणधान्य) महोत्सवाच्या आयोजनाबाबत पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार हा महोत्सव होत आहे.

महोत्सवात राज्याच्या विविध भागांतून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये ५० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येतील. ग्राहकांना

Millet
Millet Crop : पुन्हा अवतरावे भरडधान्याचे युग

अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये व यापासून तयार ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली- मिक्स, रागीचा डोसा मिक्स इत्यादी नावीन्यपूर्ण असंख्य उत्पादने थेट उत्पादकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तज्ज्ञांच्या व्याख्यानांची मेजवानी

‘‘मिलेट उत्पादन, मूल्यवर्धित प्रक्रिया उत्पादने, आरोग्यविषयक महत्त्व या विषयी नामांकित तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, खरेदीदार-विक्रेते संमेलन असा भरगच्च कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे पुण्यातील ग्राहकांनी मिलेट खरेदी, विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याबरोबरच नववर्षाची सुरवात आरोग्यपूर्ण अशा मिलेटने करावी,’’ असे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com