Water Scarcity  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : हंडाभर पाण्यासाठी लाडक्या बहिणींची भटकंती

Water Crisis : या भागातील नागरिकांची पाणीटंचाई दूर व्हावी व मुबलक पाणी मिळावे, याकरिता ‘हर घर जल योजना’ मंजूर करण्यात आली.

Team Agrowon

Roha News : तालुक्यातील दुर्गम भाग असलेला चिंचोलीतर्फे आतोणे ग्रामपंचायत क्षेत्रात खरबाची वाडी व इतर चार आदिवासी वाड्या आहेत. या ठिकाणी जवळपास ३०० ते ४०० कुटुंबे राहत असून एक हजारांहून अधिक लोकवस्‍ती आहे.

या भागातील नागरिकांची पाणीटंचाई दूर व्हावी व मुबलक पाणी मिळावे, याकरिता ‘हर घर जल योजना’ मंजूर करण्यात आली. मात्र, योजनेचे काम अपूर्ण असल्‍याने या भागातील लाडक्या बहिणींना पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

कोलाड भागातील चिंचवलीतर्फे आतोणे या भागातील वाड्यांसाठी ‘हर घर नल से जल’ योजना मंजूर करण्यात आली आहे. योजनेसाठी दोन कोटी १५ लाख ५७८ रुपयांचा निधी मंजूर करून वर्गही करण्यात आला.

३१ डिसेंबर २०२२ रोजी योजनेच्या कामाचे आदेश देण्यात आले तर २९ ऑक्टोबर २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आले होते. कामाची मुदत संपली तरी अनेक कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे महिलांना हंडाभर पाण्यासाठी डोंगर-दऱ्यांतून पायपीट करावी लागते.

पाणी योजनेचे काम प्रलंबित असल्यामुळे सध्या आतोणे भागात असलेल्या एक विहिरीच्या पाण्यावर तहान भागवावी लागते आहे. या विहिरीतून हंडाभर पाणी डोक्यावर घेऊन महिलांना पायपीट करावी लागते. वाडीत पाणी योजना राबवण्यात आली असून त्‍यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. तरीसुद्धा पिण्याचे पाणी न मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये विशेषतः महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

खरबाच्या वाडीतील महिलांना हंडाभर पाण्यासाठी दोन ते अडीच किलोमीटर खोल दरीमध्ये उतरून अनेक अडचणींना तोंड देत पाणी आणावे लागते. सकाळपासूनच पाण्याच्या शोधासाठी महिला घराबाहेर पडतात. पाणी आणण्यासाठी दरीतील पाणवठ्यावर उतरावे लागते. सध्या पावसामुळे पायवाट निसरडी झाली आहे. त्‍यामुळे काही महिला जायबंदी झाल्‍या आहेत.

योजनेच्या कामाचे ठेकेदाराकडून फलक लावले जातात; पण प्रत्यक्षात पाणी मिळतच नाही. येत्या काही दिवसांत योजनेचे काम पूर्ण न झाल्यास पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढणार.
- सुषमा विनय पवार, पदाधिकारी, जीवनधारा संस्था

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Heavy Rain: हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी

Nisaka Protest: ‘निसाका’ बचावसाठी सर्वपक्षीयांचा एल्गार 

Pulses Sowing: बारामतीत कडधान्य क्षेत्रात यंदा वाढ

Satara Rain: सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस

Mulshi Dam: मुळशी धरण क्षेत्रात सर्वाधिक २१० मिमी पावसाची नोंद

SCROLL FOR NEXT