Water Scarcity : भूगाव, भुकूमकरांना मिळणार शाश्वत पाणी

Water Storage : भूगाव आणि भुकूमच्या सिमेवर छत्रपती शिवाजी महाराज जलाशय आहे. या जलाशयात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली होती.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Pune News : भूगाव (ता.मुळशी) येथील छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील ३५ हजार टन गाळ काढण्यात आला. यासाठी नाम फाउंडेशन आणि दानशूरांच्या सहकार्याने पोकलेन, जेसीबी, हायवा आदी यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली होती.

जलाशयातून सलग दोन महिने गाळ काढण्याचे काम सुरू होते. या विधायक उपक्रमामुळे चार कोटी लिटर पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भूगाव, भुकूमकरांची टंचाई मिटून शाश्‍वत पाणी उपलब्ध होणार आहे.

भूगाव आणि भुकूमच्या सिमेवर छत्रपती शिवाजी महाराज जलाशय आहे. या जलाशयात गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. वाढत्या नागरिकरणामुळे भूगाव आणि भुकूमच्या ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना शेतीसाठी किंवा इतर वापरासाठी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते.

Water Crisis
Khandesh Water Shortage : खानदेशातील अनेक प्रकल्प कोरडेच

त्यामुळे भूगावमधील सामाजिक कार्यकर्ते अनिल करंजावणे, युवा उद्योजक माऊली सातपुते, अतुल इंगवले, दीपक चोंधे, विठ्ठल चोंधे, कुणाल घारे या सहा जणांनी एकत्र येत जलाशयातील गाळ काढण्याचे नियोजन केले. या कामासाठी नाम फाउंडेशनचे सहकार्य घेण्यात आले. फाउंडेशनच्या खर्चाने गेली दोन महिन्यांपासून दोन पोकलेनमार्फत गाळ काढण्याचे काम चालू आहे.

Water Crisis
Water Shortage : नगर जिल्ह्यात अजूनही ८६ गावांसह वाड्या-वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा

तर साँगबर्डचे बांधकाम व्यावसायिक सुशांत जाधव यांनी २५ दिवस पोकलेन उपलब्ध करून होता. त्यामुळे पहिल्या महिन्यात तीन पोकलेन, एक जेसीबी आणि नऊ हायवाच्या सहाय्याने गाळ काढला गेला. तर सध्या दोन पोकलेन, जेसीबी आणि चार हायवाच्यामाध्यमातून गाळ काढला जात आहे. दोन महिन्यात पाच हजार हायवा म्हणजेच पस्तीस हजार टन गाळ काढला गेला.

जेसीबी आणि हायवातून गाळ वाहून नेण्यासाठी ग्रामस्थांनी दानशूरांकडून आर्थिक आणि साहित्याच्या स्वरूपात मदत घेतली. त्यामध्ये साँगबर्ड, माँटव्हर्ट बिलेर, माँटव्हर्ट बेलब्रुक, फोर सिझन, सोमेट आदि गृहप्रकल्पाचे बांधकाम व्यावसायिक, काही सदनिकाधारक मदतीसाठी धावून आले. तसेच माजी उपसरपंच अक्षय सातपुते, रमेश सणस, रवी पंडित, मंगल फाळके, दशरथ शेडगे, जीवन कांबळे, सुनील चोंधे, हनुमंत चोंधे, जयंत फडके, उमेश गावडे, भाऊ पवार, ऋषी ठम्पी, वरदा बोडसे, निरंजन लागवणकर, ऋषिकेश महाजन, माऊली मरळ, अनिल घुबे, विशाल मुळुक, अभिजित दीक्षित, अलोक पुराणिक, ज्योती महाजन या दानशूरांनी सढळ हाताने आर्थिक तसेच साहित्य स्वरूपात मदत केली. तसेच भूगाव आणि भुकूमच्या ग्रामस्थांनीही या उपक्रमास सहकार्य केले.

कामावर आपली श्रद्धा जर खरी असेल तर ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी परमेश्वर कुठल्याही रूपाने येऊन मदत करतोच. असा अनुभव जलाशयातील गाळ काढण्याच्यावेळी आला. कोणतेही काम करताना माणूस पहिला पैशाचा विचार करतो. परंतु पैशाबरोबर शुद्ध भावनाही महत्त्वाची असते. दानशूरांच्या मदतीतून हे काम यशस्वीपणे होऊ शकले.
-अनिल करंजावणे, सामाजिक कार्यकर्ते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com