Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : राज्यातील प्रमुख धरणांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा; जायकवाडी ३१ टक्क्यांवर

Increase in Water Storage of Major Dams : गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सुरू झाला आहे. त्यामुळे राज्याच्या विविध जिल्ह्यात असणाऱ्या प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने राज्यभर हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. मध्यंतरी ऊन आणि असह्य करणाऱ्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता दिलासा मिळण्यास सुरूवात झाली असून पाऊस सुरू झाल्याने शेतकरीही सुखावला आहे. राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. तर राज्यातील सर्व २९९७ धरणांमधील पाणीसाठा ६९.३२ टक्क्यांवर गेला आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यात हवीतशी वाढ झालेली नाही. तर जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या धरणात ३१.३४ टक्के पाणीसाठा आहे. 

राज्याच्या जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील प्रमुख १३८ धरणामध्ये ७६.०९ टक्के पाणीसाठी झाला असून मागील वर्षी याच दिवशी तो ६८.३६ टक्के होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ७.७३ टक्के अधिक उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यात सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागाच्या प्रमुख ११ धरणांमध्ये झाला असून ९३.९० टक्के धरणे भरली आहेत. पुणे विभागातील ३५ धरणांचा पाण्यासाठा ९०.६९ टक्के, नागपूर विभागातील १६ धरणात ७८.६३ टक्के, नाशिक विभागातील २२ धरणात ७४.५७ आणि अमरावती विभागातील १० प्रमुख धरणांमधील पाणीसाठा ६२.८० टक्क्यांवर गेला आहे.

विभागात ६.२४ टक्के कमी पाणीसाठा 

राज्यातील विविध जिल्ह्यांतील धरणामध्ये पाणीसाठ्यात वाढ होत असतानाच मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४४ धरणांमध्ये मागील वर्षापेक्षा ६.२४ टक्के पाणीसाठा कमी आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत असून येथील धरणांमध्ये ३१.७९ टक्के पाणीसाठा पोहचला आहे. तर मागील दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ३१.३४ टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या वर्षी जायकवाडीचा पाणीसाठा याच दिवशी ३३. ९७ टक्के होता.

हवामान विभागाचा अंदाज 

दरम्यान हवामान विभागाने मंगळवारी (ता.२०) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देताना येलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, आणि गडचिरोली जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT